आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता प्रकाश बनली टीव्ही अभिनेत्री, \'ये है आशिकी\'मध्ये लवकरच झळकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रिय बालकलाकार अमृता प्रकाश आता टीव्ही अभिनेत्री बनली आहे. ती आता 'ये है आशिकी'मध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. ही प्रसिध्द कलाकार या शोच्या आगामी एपिसोडमध्ये एका भारतीय तरूणीची भूमिका साकारणार आहे, या शोमध्ये ती एका पाकिस्तानी तरूणावर प्रेम करते.
प्रसिध्द अभिनेत्री अमृता प्रकाशने 'जिसने तुम बिन', 'विवाह' आणि 'वी आर फॅमिली' यांसारख्या सिनेमात बाल कलाकार म्हणून काम केले आहे. आता ती बिन्दास चॅनलच्या 'ये है आशिकी' या शोच्या आगामी एपिसोडमध्ये झळकणार आहे. या आठवड्यात शोमध्ये एक वेगळी प्रेमकथा प्रसारित केली जाणार आहे.
अमृता तबस्सुम नावाच्या भारतीय तरूणीच्या भूमिकेत ती दिसेल. ही तरुणी पाकिस्तानी तरूण शादाबवर प्रेम करते.
या अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरूवात खूप कमी वयात केली होती. तिने बॉलिवूडमध्येच नव्हे तर काही मल्याळम सिनेमातही काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने टीव्हीवरील काही शोमध्ये काम करून ओळख निर्माण केली आहे.
शोमधील पात्राविषयी आणि अनुभवाविषयी अमृताला विचारल्यानंतर तिने सांगितले, 'ये है आशिकीसाठी शुट करणे खूप मनोरंजक होते. याचे श्रेय मी बिन्दास टीमला देऊ इच्छिते. यामध्ये सर्व काही व्यवस्थित नियोजन केलेले होते. हा शो एक रंजक प्रेमकथेसोबतच खूप सुंदर शो आहे. हा भारतीय टेलिव्हिजनच्या इतर शोपेक्षा एका वेगळ्या कल्पनेचा आहे.'
'मी 'ये है आशिकी'मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला, कारण या शो मध्ये ही एक वेगळी आणि सीमेच्या पलिकडची एक रंजक कथा मांडली आहे. मी तबस्सुम नावाच्या एका साध्या तरूणीची जीवंत भूमिका साकारत आहे. जी एका चांगल्या घरातील तरूणी आहे.'
अमृताच्या व्यतिरिक्त या शोमध्ये अभिनेता यासिर शाहसुध्दा दिसणार आहे, जो शाबाद नावाच्या तरूणची भूमिका साकारत आहे. या एपिसोडची होस्टिंग टेलिव्हिजन अभिनेता ऋत्विक धनजानी करणार आहे. ही रंजक आणि वेगळी प्रेमकथा येत्या रविवारी (26 जानेवारी)ला संध्याकाळी 7 वाजता बिन्दास चॅनलवरच्या 'या है आशिकी' शोमध्ये प्रसारित केली जाणार आहे.