आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ये जवानी’ला फिल्म फेअरची नऊ नामांकने, 59 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 59 व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. रणबीर कपूर व दीपिका पदुकोन यांच्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह नऊ नामांकने मिळाली आहेत.
‘ये जवानी है दीवानी’च्या खालोखाल दीपिकाच्या ‘रामलीला’ या चित्रपटाने 7 नामांकने पटकावली आहेत. यात संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह संगीकाराच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे, तर फरहान अख्तरला ‘भाग मिल्खा भाग’साठी अभिनेत्यासाठी नामांकंन मिळाले आहे. या चित्रपटासाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ व ‘रांझणा’ला प्रत्येकी सहा नामांकने मिळाली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याठी शाहरुख खान, हृतिक रोशन यांनाही स्थान देण्यात आले आहे.
सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा यादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या रेसमध्ये आहेत. आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नवाजोद्दीन सिद्दिकी, पंकज कपूर, विवेक ओबेरॉय यांनाही सहकलाकारांसाठी नामांकने मिळाली आहेत, तर कोंकणा सेन शर्मा, सुप्र्रिया पाठक यांना सहअभिनेत्रींसाठी स्थान मिळाले आहे.
‘लुटेरा’ चित्रपटातील ‘सवार लूं’ या गाण्यासाठी मोनाली ठाकूरला पार्श्वगायनासाठी नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारांचे वितरण 24 जानेवारीला होणार आहे.
मी तर सिंगलच : दीपिका
माझे कोणासोबतही प्रेमसंबंध नाहीत. सध्या मी सिंगलच असल्याचे ठाम मत अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने व्यक्त केले आहे. रामलीला चित्रपटादरम्यान तिच्यात आणि रणवीर सिंह यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत होते.