आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yeh Jawani Hai Deewani In 100 Crore Club Of Bollywood

बॉक्स ऑफिस: ‘ये जवानी...’ 100 कोटी क्लबमध्ये!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ब्रेकअप झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी एकत्र आलेले अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करण्यास सुरुवात केली असून केवळ पाच दिवसांत या चित्रपटाने सलमान खानच्या ‘दबंग-2’ला मागे टाकत 100 कोटी क्लबमध्ये दमदार एंट्री केली आहे. मंगळवारपर्यंत 110 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट लवकरच 200 कोटींचा पल्ला गाठेल, असे चित्रपट जाणकारांना वाटते.

‘ये जवानी...’ शुक्रवारी देशात आणि परदेशात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्डतोड 19 कोटींची कमाई केली. शनिवारी 20 कोटी आणि रविवारी 22 कोटी आपल्या नावावर केले. पाचव्या दिवशी चित्रपटाने शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून तेथे 4 कोटींची कमाई झाली आहे. रणबीर आणि दीपिकाने याआधी 2008 मध्ये ‘बचना यै हसिनो’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण बहरले. मात्र, कॅटरिना कैफवरून त्यांच्यात ब्रेकअप झाले. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर या जोडीने व्यावसायिक दृष्टिकोनातून पुन्हा एकत्र येत ‘ये जवानी...’ चित्रपटाला संमती दिली. त्यामुळेच चित्रपटात त्यांची रियल केमिस्ट्री ऑन स्क्रीनही दिसत आहे.

रणबीर ‘बेशरम’मध्ये व्यग्र
सध्या रणबीर कपूरकडे अनेक चित्रपट आहेत. यात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव याच्या ‘बेशरम’ या चित्रपटाचा समावेश आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाचे प्रोमो टीव्हीवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर हिट होईल, असा विश्वास रणबीरने व्यक्त केला आहे.