अक्षय कुमार आणि
शाहरुख खानसारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटांत आपल्या आवाजाची छाप सोडणारा संगीतकार हनी सिंग आता
सलमान खानच्या आगामी चित्रपटातील संगीताचा एक भाग बनत आहेत. दोघांनीही यासंदर्भात चर्चादेखील केली आहे. या गोष्टीला काही दिवस होतायेत तोपर्यंत हनी सिंह अमिताभसोबत ‘भूतनाथ रिटर्न्स ’या बॉलिवूड चित्रपटात आवाज देणार आहे.
अमिताभ बच्चनने याला अधिकृतरीत्या दुजोरा दिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, ‘भूतनाथ रिटर्न्स’ मध्ये एका गाण्यासाठी यो यो हनी सिंग दिसून येईल. नितेश तिवारीच्या दिग्दर्शनामध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाचा निर्मिती टी-सिरीजने केली आहे. यासोबतच हनी सिंग ‘रागिणी एमएमएस -2’मध्ये ‘चार बॉटल वोदका’ हे गाणे गाणार असून त्या व्हिडिओमध्ये सनी लियोन झळकणार आहे.