आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज होण्यापूर्वीच जंजीरने कमविले कोट्यवधी रुपये, जाणून घ्या कसे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा आणि प्रियंका चोप्रा अशी प्रमुख स्टारकास्ट असलेल्या जंजिर या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपये कमविले आहेत. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट वादात अडकला होता. परंतु, तरीही आर्थिक बाबींवर हा चित्रपट यशस्वी ठरत आहे.


रिलायंस एन्टरटेन्मेंट या कंपनीने तयार केलेला हा चित्रपट तेलगू भाषेत तुफान या नावाने रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे तेलगू भाषेतील सॅटेलाईट हक्क 55 कोटी रुपयांना तर हिंदी भाषेतील सॅटेलाईट हक्क 10 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

तेलगू आणि हिंदी या दोन भाषांमधील संगीत हक्क प्रत्येकी 5 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही भाषांमध्ये चित्रपट निर्मिती आणि पब्लिसिटीवर करण्यात आलेला 60 कोटी रुपये खर्च आधीच भरून निघाला आहे.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर ओव्हरसीज, हिंदी बाजार आणि व्हिडिओ मार्केटमधून 30 कोटी रुपये उत्पन्न होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये रामचरण तेजा याचे चित्रपट सहज 60 कोटींचा व्यवसाय करतात. या चित्रपटातूनही सुमारे 60 कोटी रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

स्वतः दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी हिंदी व्हर्जनला कॉस्ट फ्रि व्हर्जन असल्याचे सांगितले आहे. एकट्या तेलगू व्हर्जनची कमाई दोन्ही भाषांच्या कॉस्टपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाचे काही दृष्ये बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...