आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी सिने अवॉर्डमध्ये बॉलिवूड स्टार्सनी लावली हजेरी, बघा रेड कार्पेटवरील दीपिका-प्रियांकाचा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या रात्री (8 फेब्रुवारी) झी सिने अवॉर्ड सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावून त्याची शोभा वाढवली. दीपिका पदुकोणपासून ते प्रियांका चोप्रा, एली अवराम, फरहान अख्तर आणि विद्युत जामवालासारख्या स्टार्सची उपस्थिती या सोहळ्याला होती.
या सोहळ्यात दीपिकाने गोल्डन रंगाचा गाउन परिधान केला होता. त्यामध्ये ती एका प्रिन्सेससारखी दिसत होती. तसेच, प्रियांकाने गुलाबी आणि गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती. सलमान खानची आवडती एली अवरामने गुलाबी रंगाचा गाउन परिधान करून सोहळ्याला हजेरी लावली होती.
सोबतच, बॉलिवूड अभिनेता फराहन अख्तरने निळ्या रंगाचा सूट घातला होता आणि डान्स रिअ‍ॅलिटी शो 'नच बलिये'चा विजेता ऋत्विकने ब्लॅक रंगाचा सूट परिधान केला होता.
अवॉर्ड सोहळ्यात 'फुकरे'चा स्टार आणि 'बेशरम'मधील रणबीरची को-स्टार पल्लवी शारदानेसुध्दा उपस्थिती लावली होती. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या कार्यक्रमाची काही खास छायाचित्रे...
पुढील स्लाइड्सवर क्लिका करा आणि बघा अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित असलेल्या स्टार्सची रेड कार्पेटवरील छायाचित्रे...