आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या \'सेक्स सिम्बॉल\' झीनत अमानच्या आयुष्यातील वाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


झीनत अमानने पुन्हा एकदा लग्न केल्याची चर्चा रंगत आहे. 60 वर्षीय झीनतने 36वर्षीय सरफराज अहमदबरोबर लग्न केल्याचे बोलले जात आहे.

1970 साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनतने लॉस एंजिल्समधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. झीनतने मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1971 साली ओ.पी. राल्हन यांच्या 'हलचल' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 70 च्या दशकात झीनतची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकत होती.

करिअर यशोशिखरावर असताना खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ उतार पाहावे लागले. संजय खानबरोबरचे अफेअर आणि मारहाणीच्या घटनेमुळे झीनत चर्चेत राहिली.

झीनतच्या करिअर आणि खासगी आयुष्यातील वादासंदर्भात जाणून घ्या...