आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गे लव्ह स्टोरीवर आधारित सिनेमाद्वारे कमबॅक करत आहे झीनत अमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या बिनधास्त अदांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. बॉलिवूडमध्ये तिला बोल्ड अँड ब्युटीफूल म्हणून ओळखले जाते. आता ब-याच वर्षांनी झीनत रूपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. गे लव्ह स्टोरीवर आधारित 'Dunno Y ना जाने क्यों' (डोन्ट नो व्हाई) या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये झीनत झळकणार आहे. या सिनेमात झीनत पाकिस्तानी स्त्रीच्या भूमिकेत आहे.
2010 साली रिलीज झालेल्या या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये झीनत अमान झळकणार असल्याचे सिनेमाच्या लेखक कपील शर्माने स्पष्ट केले आहे. मात्र झीनतने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.