आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षांच्या झीनतने केले 36 वर्षांच्या शिवसेना नेत्याबरोबर लग्न?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री झीनत अमानने गुपचुप लग्न केले असल्याची बातमी आहे. झीनतने सरफराज अहमद या शिवसेना नेत्याबरोबर गुपचुप लग्न केले असल्याचे बोलले जात आहे.

सरफराज झीनतपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. झीनत 60 वर्षांची आहे तर सरफराजचे वय 36 आहे. अफवांवर विश्वास ठेवला तर, दोघांनीही सहा महिन्यांपूर्वीच लग्न केले असून दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर हे दोघेही मुंबईतील बांद्रा येथील माऊंट मेरीजवळ आपल्या फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहेत. लग्न ठरल्यापासून पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखे वाटत असल्याचे झीनतने म्हटले होते. तसेच तिच्या मुलांनीही याबाबत आनंद व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

झीनतने 1981 मध्ये विवाहित संजय खानबरोबर लग्न केले होते. मात्र त्या दोघांत लवकरच बिनसले व एक-दोन वर्षातच ते विभक्त झाले. त्यानंतर तिने 1985-86 मध्ये मजहर खानबरोबर लग्न केले. मजहरपासून झीनतला अजान (26) आणि जहान (23) अशी दोन मुले आहेत. मजहर यांचे 1998 मध्ये निधन झाले. त्यानंतरही झीनतचे नाव पाकिस्तानचा क्रिकेटर इम्रान खानबरोबर जोडण्यात आले होते. झीनत सध्या मुंबईत आपल्या मुलांबरोबर राहत आहे.