आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 60व्या वर्षी पुन्हा लग्नगाठीत अडकणार झीनत अमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या बिनधास्त अदांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री झीनत अमानला पुन्हा एकदा लग्नाचे वेध लागले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी झीनतने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र झीनत कुणाबरोबर लग्नगाठीत अडकणार याबाबत त्यांनी मौन बाळगला आहे. मात्र ज्या व्यक्तीबरोबर लग्न करणार आहे, ती व्यक्ती भारतीयच असल्याचे झीनत यांनी सांगितले.

झीनतची दोन मुले अजान (26) आणि जहान (23) यांनीही आपल्या आईला लग्नासाठी पाठिंबा दर्शवला आहे. आईने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजान आणि जहान दोघेही उत्साहित आहेत.
यासंदर्भात झीनत यांनी सांगितले की, ''माझ्या या निर्णयामुळे माझी दोन्ही मुले खूप खुश आहेत. मी जेव्हा त्यांना आपला निर्णय सांगितला तेव्हा, तुम्ही योग्य निर्णय घेतला असून आपल्या आयुष्यात तुम्ही आनंदी राहा असे त्यांनी मला म्हटले.''

झीनत अमान यांचे पती मजहर खान यांचे 1998 साली निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर झीनत अमान यांच्या लग्नावरुन विश्वासच उठला होता. मात्र आपला निर्णय देवाच्या निर्णयापुढे मोठा नाही, असे झीनत यांनी म्हटले. मी ज्या व्यक्तीला भेटले ती व्यक्ती माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. त्याला भेटून मला पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटतंय, असेही झीनत यांनी सांगितले.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी झीनत आणि ऋतिक रोशनचे सासरे संजय खान यांचे अफेअर होते. मात्र कालांतराने हे दोघेही विभक्त झाले होते.