आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Reasons Why Rakhi Sawant Should Be In Chidiya Ghar

Ewww: राखीचा हा अवतार पाहून चाहते होतील अचंबित, उडतील त्यांचे होश!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणा-या राखी सावंतला प्रसिद्धीझोतात कसे राहावे, हे चांगलेच ठाऊक आहे. कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी बोल्डनेसमुळे ती चर्चा एकवटत असते. शिवाय काही महिन्यांपूर्वी ब्रेस्ट सर्जरीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करुन ती लाइमलाइटमध्ये आली होती. इतकेच नाही तर आपल्या विचित्र आणि तोकड्या आउटफिट्समुळेसुद्धा ती लोकांचे लक्ष वेधून घेत असते. एकंदरीतच काय तर राखी सावंत आणि प्रसिद्धी हे जणू नातेच निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांत राखी सावंतने तयार केलेली इमेज आजवर कुणीही पुसून काढू शकलेले नाही. या तरुणी संघर्षातूनच स्वतःचे वेगळे अस्तित्व येथे निर्माण केले आहे. अनेक वादग्रस्त रिअॅलिटी शोजमध्येही ती झळकली आहे. एकंदरीतच राखीने आपल्या करिअरमध्ये सर्वच गोष्टी केल्या, असे म्हटलं तर वावगे ठरु नये.
आता ही बोल्ड अभिनेत्री अवतरली आहे 'चिडिया घर'मध्ये. सब टीव्हीवरील गाजत असलेल्या 'चिडिया घर' या मालिकेत ती झळकत आहे. या मालिकेत 'पती पत्नी और वो' असा काहीसा तिचा रोल आहे. पती-पत्नीत फूट पाडण्याचे काम ती या मालिकेत करत आहे. येथेही तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.
पाहुयात, राखी सावंतचा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा चित्रविचित्र आउटफिट्समधील लूक...