मुंबईः 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हिना खान (अक्षरा) 30 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 2 ऑक्टोबर 1987 रोजी श्रीनगर येथे झाला. हिनाने गुडगांव येथून एमबीए पूर्ण केले. हिनाने 2009 साली 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेत हिनाने तिच्याच वयाचा अभिनेता रोहन मेहरा (नक्श) आणि शिवांगी जोशी (नायरा) यांच्या आईची भूमिका साकारली.
केवळ हिना खानच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्याच वयाच्या कलाकारांच्या आईची भूमिका वठवली आहे. यामध्ये श्वेता तिवारी, देबोलिना भट्टाचारजी, स्नेहा वाघ, अंकिता लोखंडे आणि आम्रपाली गुप्तासह अनेक अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींची माहिती देत आहोत.
पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणकोणत्या TV अभिनेत्रींनी समवयीन कलाकारांच्या आईची भूमिका वठवली...