आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकताच्या मालिकांमध्ये बनले दीर-वहिनी, बहीण-भाऊ; सेटवर जुळले सुत आणि अडकले लग्नगाठीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई :टीव्ही क्वीनच्या नावाने प्रसिद्ध एकता कपूरने अनेक नवीन चेह-यांना तिच्या टीव्ही मालिकांमधून लाँच केले आहे. या स्टार्सना घराघरांत लोकप्रिय करण्यामागे एकताचा मोठा वाटा आहे. सेलेब्सच्या करिअरसोबतच त्यांची लव्ह लाईफसुद्धा एकताच्या शोजसोबत जुळली आहे. अनेक स्टार्सची भेट शोच्या सेटवर झाली. शूटिंगच्या काळात जवळीक वाढली आणि नंतर हे सेलिब्रिटी खासगी आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकले. मालिकेत दीर-वहिनी, बहीणभावाच्या भूमिकेत झळकलेल्या जोड्या खासगी आयुष्यात एकमेकांच्या जोडीदार बनल्या.
राम कपूर- गौतमी गाडगीळ
शो: घर एक मंदिर (2000-2002)
लग्नाचे वर्ष : 2003

राम कपूर आणि गौतमी गाडगीळची प्रेम कहाणी एकता कपूरची टीव्ही मालिका 'घर एक मंदिर'च्या सेटवर सुरु झाली होती. त्याकाळात गौतमीचे करिअर सेट झाले होते. मॉडेलिंगमध्ये गौतमीचे नाव होते. तर राम कपूरचे करिअर रुळावर यायचे होते. या मालिकेत गौतमीने राम कपूरच्या वहिनीची भूमिका साकारली होती. शूटिंगच्या निमित्ताने दोघांची दररोज भेट व्हायची. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नासाठी राम आणि गौतमीने 14 फेब्रुवारी 2003 अर्थातच व्हॅलेंटाईन डेची निवड केली होती. आता या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

रिंकू धवन आणि किरण करमाकर
शो: कहानी घर-घर की (2000-08)
लग्नाचे वर्ष : 2001

एकता कपूरचा सुपरहिट शो 'कहानी घर घर की'मध्ये रिंकू आणि किरण यांनी बहीणभावाची भूमिका वठवली होती. सेटवर ऑनस्क्रिन बहीणभाऊ खासगी आयुष्यात मात्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मार्च 2001 मध्ये दोघे लग्नाच्या गाठीत अडकले.

एकता कपूरच्या शोमधील कोणकोणते सेलिब्रिटी खासगी आयुष्यात एकमेकांचे आयुष्यभराचे जोडीदार बनले, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...