आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकताच्या मालिकांमध्ये जुळले या 10 TV कपल्सचे सूत, रिअल लाइफमध्ये अडकले लग्नाच्या बेडीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी मालिका घराघरांत लोकप्रिय करण्यामागे टीव्ही क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकता कपूरचा मोठा वाटा आहे. अनेक कलाकारांच्या करिअरसोबतच त्यांची लव्ह लाईफसुद्धा एकताच्या शोजसोबत जुळली आहे. अनेक स्टार्सची भेट शोच्या सेटवर झाली. शूटिंगच्या काळात जवळीक वाढली आणि नंतर हे सेलिब्रिटी खासगी आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकले. मालिकेत दीर-वहिनी, बहीणभावाच्या भूमिकेत झळकलेल्या जोड्या खासगी आयुष्यात एकमेकांच्या जोडीदार बनल्या. 

 

रिंकू धवन आणि किरण करमारकर
अशीच एक जोडी म्हणजे रिंकू आणि किरण करमारकर. एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. या मालिकेत त्यांनी भावंडांची भूमिका साकारली होती. त्यावेळी दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी 2002 मध्ये विवाह केला. पण लग्नाच्या 15 वर्षांनी आता दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. किरण आणि रिंकू यांच्यामध्ये बरेच वाद असल्यामुळे हे दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, किरण आणि रिंकूला कसे वागावे याची योग्य समज आहे. त्यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, त्यावर कोणताच उपाय दिसत नाही. त्यामुळे मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा मार्ग त्यांना योग्य वाटतो. या दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला असून, त्यांना आता केवळ त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे. आपल्या खासगी आयुष्यावर रिंकू आणि किरणला कोणतीही चर्चा नको आहे. लोकांमधील चर्चांचा आपल्या मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा समज असल्यामुळे ते त्याची विशेष काळजी घेत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले आहे.  

 

रिंकू आणि किरण हे जरी आता विभक्त होत असले, तरी इतर सेलिब्रिटी कपल मात्र सुखी संसार करत आहेत. जाणून घेऊयात एकता कपूरच्या शोमधील कोणकोणते सेलिब्रिटी खासगी आयुष्यात एकमेकांचे आयुष्यभराचे जोडीदार बनले.... 

 

बातम्या आणखी आहेत...