आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अवघ्या 16 वर्षांची ईशा टीव्हीवर झाली \'विधवा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ईशा सिंह)
मुंबई- कलर्सच्या 'इश्क का रंग सफेद' या टीव्ही शोमध्ये नवोदित अभिनेत्री ईशा सिंह मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत ती 20 वर्षांच्या विधवा धानीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती बनारसच्या सोसायटीमध्ये राहते आणि या समाजात परंपरेचा बोलबाला आहे. विशेष म्हणजे, रिअल लाइफमध्ये ईशाचे वय केवळ 16 वर्षे आहे. भोपाळ, मध्यप्रदेशमध्ये जन्मलेली आणि तिथेच लहानाची मोठी झालेल्या ईशाने येथीलच श्री भवंस भारती स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. ती कॉमर्सची विद्यार्थीनी आहे. सध्या ईशा मुंबईमध्ये आपल्या आईसोबत राहत आहेत, तिचे वडील आणि भाऊ भोपाळमध्ये वास्तव्याला आहेत.
divyamarathi.comसोबत बातचीत करताना ईशाने सांगितले, की अभिनेत्री होण्याचे स्वप्न बालपणापासूनच तिच्या मनात होते. ती सांगते, 'माझे चौथीपासून अभिनेत्री होण्याची स्वप्न होते. मोठी होत असतानाच माझे विचारसुध्दा बदलले. यादरम्यान माझ्या डोक्यात डॉक्टर, इंजिनिअरपासून एअरहॉस्टेस होण्याची इच्छा निर्माण झाली. 10वीची परिक्षा दिल्यानंतर मी ठरवले, की मला अभिनयात करिअर करायचे आहे. मी खूप आनंदी आहे, की मला धानीची भूमिका करण्याची संधी मिळाली. धानी ईशाच्या उलट आहे. ईशा खूप जास्त बोलते तर धानी खूप कमी बोलते. धानीला मर्यादेत राहावे लागते. ईझा थोडी ग्लॅमरस आहे, धानी डी-ग्लॅम आहे. ईशाला हसायला आवडते, धानीला हसण्यावर नियंत्रण ठेवावे लागते.'
ईशाने या बातचीतदरम्यान सांगितले, की तिला हा शो कसा मिळाला. ईशा सांगते, 'माझ्या काकांनी (जे स्वत: टीव्ही इंडस्ट्रीशी जुळलेले आहेत.) मला या शोसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. मी ऑडिशन दिल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर मला कन्फर्मेशन कॉल आला. आजसुध्दा मला विश्वास बसत नाहीये, की मी अभिनयात करिअर करण्यास सुरुवात केली आहे.'
ईशा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत असली तरी ती यापूर्वी 'सतरा को शादी है' सिनेमात झळकली होती. मात्र हा सिनेमा अद्याप रिलीज झालेला नाहीये. या सिनेमात ती मुख्य नायिका सपना पब्बीच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. सिनेमा जॉन अब्राहमने निर्मित केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ईशाचे फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतचे खास PHOTOS...