आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 'जस्सी' फेम मोना सिंगचा कथीत 'एमएमएस'चे रहस्य उलगडले असले तरी आजही हा एमएमएस इंटरनेटवर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. होळीची मस्ती होती की, लोकांना एप्रिल फुल बनविण्याचा प्रयत्न, हे मात्र अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. परंतु, दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. कथीत एमएमएस मोना सिंगचा नसून तिचा चेहरा त्यात वापरण्यात आला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे, मोना सिंग 'बिग बॉस'मध्ये जाण्याची शक्यता आहे.
इंटरनेटवरील कथीत एमएमएसमुळे मोना सिंह हिला खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे. परंतु अजूनही हा एमएमएस इंटरनेवरील अनेक संकेतस्थळांवर असून मोठ्या संख्येने तो पाहिला जात आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी केलेला दावा फोल ठरला आहे. एक डझनपेक्षा जास्त संकेतस्थळावरून कथीत एमएमएस डिलीट केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु गूगलवर 'मोना सिंह एमएमएस' टाइप करताच अनेक संकेतस्थळांवरील एमएमएस उघडतो.
मोना सिंगच्या 'एमएमएस'बाबत सायबर सेलने तपास केला. हा एमएमएस तिचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोनाचा चेहरा त्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे. तज्ज्ञांनी हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत मोनाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. तर याच 'एमएमएस'ने तिच्यासाठी 'बिग बॉस'ची कवाडंही खुली होवू शकतात. धर्मा प्रॉडक्शनच्या सहायक दिग्दर्शिका स्नेहल गांधी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'बिग बॉस'ला पहिला स्पर्धक मिळाला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या एमएमएसचे मूळ शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. दिल्लीतून हा एमएमएस अपलोड करण्यात आला आहे. या ठिकाणाचा शोध घेणे सुरु आहे. पोलिसांना अशा प्रकारच्या दोन क्लिप सापडल्या आहेत. परंतु, त्या 5 ते 6 वर्षे जुन्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.