आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: 4G Girl बनून मिळवली ओळख, आता झळकू शकते TV शोमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साशा छेत्री - Divya Marathi
साशा छेत्री
मुंबई: एका टेलीकॉम कंपनीच्या 4G जाहिरातीने प्रकाशझोतात आलेली साशा छेत्री आता टीव्ही शोध्ये झळकणार आहे. की टीव्ही शो होस्ट करताना दिसणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'डान्स प्लस'च्या दुस-या पर्वासाठी तिला अॅप्रोच करण्यात आले आहे. याविषयी सध्या बातचीत सुरु आहे. जर तिने होकार दिला तर डान्सर राघव जुयालसोबत ती शो होस्ट करताना दिसेल.
कोण आहे साशा?
कमी कालावधीतच 4G गर्ल म्हणून प्रसिध्द झालेली साशा छेत्री देहरादून, उत्तराखंडची रहिवासी आहे. वयाच्या 19व्या वर्षी साशाने मुंबईच्या जेव्हिअर इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन कॉलेजमधून अॅडव्हरटाझिंगमध्ये पदवी शिक्षण घेतले. ती एक म्यूझिक आर्टिस्टसुध्दा आहे. परंतु टेलिकॉम कंपनी 4G जाहिरातीपूर्वी तिला अभिनय आणि मॉडेलिंगचा काही अनुभव नव्हता. ही जाहिरात टीव्हीच नव्हे इंटरनेटवरसुध्दा खूप लोकप्रिय झाली.
कशी मिळाली जाहिरात...
साशाने माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर ती मॉडेलिंगकडे आकर्षित झाली. साशाने प्रोफाइल व फोटो काही जाहिरात एजन्सीच्या साइटवर अपलोड केले. त्या काळात एअरटेल कंपनी 4G च्या जाहिरातीसाठी नवा चेहरा शोधत होती. कंपनीला साशाचा प्रोफाइल भावला आणि तिला मुंबईत आमंत्रित केले. एअरटेल 4Gच्या जाहिरातीसाठी तिची निवड केली. पाहाता पाहाता ही जाहिरात सुपरहिट ठरली. जाहिरातीलने कंपनीला मोठा फायदा झाला.
साशा नेपाळी असल्याचे बहुतेकजण म्हणतात. बीबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साशाला आता मॉडेलिंगमध्ये करियर घडवायचे आहे. सिनेमांमध्येही काम करण्‍याची तिची मनीषा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साशा छेत्रीचे निवडक PHOTOS...