आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिआंड्रा प्रेग्नेंट, सोनालीला किस, \'बिग बॉस\'मधील गौतीचे चर्चेतील 5 विवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- डिआंड्रा आणि गौतम)
कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा चर्चेतील रिअॅलिटी शो 'बिग बॉस हल्लाबोल'चा ग्रँड फिनाले 31 जानेवारीला झाला. 135 दिवस चालेल्या या शोमध्ये अनेक वाद, भांडण पाहायला मिळाले. यामध्ये डिआंड्रा आणि गौतम यांच्यातील वाढती जवळीक सर्वाधिक चर्चेत राहिली. डिआंड्रा प्रेग्नेंट असल्याची बातमी जेव्हा मीडियात तेव्हा मात्र सर्वत्र खळबळ उडाली होती. डिआंड्रा गौतमपासून प्रेग्नेंट असल्याचेही बोलले गेले होते. कारण दोघांना अनेकदा बाथरुममध्ये बंद होताना पाहिल्या गेले होते.
मॉडेल आणि टीव्ही पर्सनॅलिटी डिआंड्रा सॉरेसला तिच्या प्रेग्नेंसीमुळे 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र घरातून बाहेर येताच तिने आपल्या प्रग्नेंसीवर स्पष्टीकरण दिले. डिआंड्राने स्पष्ट सांगितले, एका किसमुळे कुणी प्रेग्नेंट होत नाही.
गौतम-करिश्माचे भांडण-
'बिग बॉस'च्या सुरुवातीलाच गौतम आणि करिश्मा यांच्यात जोरदार भांडण झाले होते. 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना लग्जरी बजेट टास्क दिला होता. यावेळी गौतम चेअरवर बसलेला होता आणि करिश्मा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी गौतम उठला नाही म्हणून करिश्माने त्याच्या तोंडावर मिरची पावडर फेकली. गौतम या कृत्या करिश्मावर ओरडला. एवढेच नव्हे, गौतमने करिश्माविषयी अपशब्दांचा वापरदेखील केला होता. त्यामुळे दोघांत जोरदार भांडण झाले होते. मात्र काही दिवसांनी गौतमने करिश्माची माफी मागितली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा गौतम गुलाटीच्या संबंधित वाद...