आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यानंतर संपुष्टात आले 'अंगूरी भाभी'चे नाते, होता-होता राहिले या कपल्सचे लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई:  कोक स्टूडिओचे गाजलेले गाणे 'आफरीन...'मध्ये राहत फतेह अली खान यांच्यासोबत झळकलेली पाकिस्तानी गायिका मोमिना मुस्तेहसन हिने अलीकडेच तिचा साखरपुडा मोडला असल्याची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. एखाद्या सेलिब्रिटीचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा असते. मात्र इंडस्ट्रीत असे अनेक कपल्स आहेत, ज्यांचा साखरपुडा झाला खरा पण लग्न होता-होता राहिले. या पॅकेजमधून एक नजर टाकुया अशा काही टीव्ही सेलिब्रिटींवर, ज्यांनी गाजावाजा करत साखरपुडा केला खरा, पण त्यांचे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचू शकले नाही.  
 
शिल्पाच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या.... 
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांना हसवणारी अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदेचं खासगी आयुष्यही अनेक चढउतारांनी भरलेलं आहे. फारच कमी लोकांना माहित आहे की, शिल्पा शिंदेचं लग्न होता होता राहिलं. शिल्पाच्या लग्नाची तारीख-ठिकाण ठरलं होतं. इतकंच काय कार्डही छापण्यात आले होते. पण शिल्पानेच लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. टीव्ही अभिनेता रोमित राजसोबत शिल्पा शिंदेचं लग्न होणार होतं. शिल्पा आणि रोमितने ‘मायका’ आणि ‘मात-पिता के चरणों में स्वर्ग’ या मालिकांमध्ये एकत्र कामही केलं होतं. ‘मायका’ मालिकेत शिल्पा आणि रोमित यांची जोडी होती. याचदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. दोघे प्रेमात पडले. कुटुंबीय, नातेवाई आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत 29 नोव्हेंबर 2009 रोजी गोव्यात लग्न करण्याचा निर्णय झाला. शिल्पानेच सांगितलं होतं, की लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या. पण नंतर परिस्थिती अशी झाली की शिल्पाने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत शिल्पाने लग्न मोडण्याचं कारण सांगितलं होतं. तिच्या मते, करवा चौथच्या दो दिवस आधी तिला जाणवलं की, रोमित एक समजूतदार पती बनू शकत नाही. शिल्पाच्या दाव्यानुसार, तिने रोमितला अडचणी सांगितल्या. पण रोमितने अडचण न समजताच तिच्या कुटुंबीयांचा अपमान केला. अखेर शिल्पाने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. शिल्पाच्या माहितीनुसार, लग्न न करण्याविषयी रोमितला सांगितलं, पण त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

रोमित आता विवाहित, एका मुलीचा पिता
शिल्पासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रोमितने 28 मार्च 2010 रोजी पुण्यात टीना कक्कडसोबत लग्न केलं. तो आता एका मुलीचा वडील असून मुलीचं नाव रिया राज ठेवलं आहे. शिल्पा आणि रोमितचं लग्न ठरलं होतं, तेव्हा त्याने रंजन शाहीच्या ‘मात-पिता के चरणों में स्वर्ग’ मध्ये कॅमियो केला होता. विशेष म्हणजे हा कॅमियो वेडिंग ड्रेस रिहर्सलसारखा होता, ज्यात दोघे वर-वधू बनले होते. एवढंच नाही तर त्यांचे फ्रेण्ड्स शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
 
साखरपुड्यानंतर कोणकोणत्या सेलिब्रिटींचे लग्न मोडले, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...