आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अंगूरी भाभी\'पासून \'पार्वती\'पर्यंत, जेव्हा या 8 TV स्टार्सना निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'देवो के देव महादेव' या मालिकेमधील पार्वतीची भूमिका करणारी सोनारिका भदोरीयाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच आकर्षित केले. पण ती चर्चेत तेव्हा आली जेव्हा मालिकेच्या निर्मात्यांनी तिला शोमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे कारण असे होते, की सोनारिका मेकअप आणि कॉश्च्युम्ससाठी सेटवर नखरे दाखवायची. तिच्या वाढत्या मागण्या इतक्या टोकास गेल्या, की तिला या शोमधूनच बाहेर पडावे लागले. सोनारीकाने मागीलवर्षी 'सांसे' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यु केले होते. चित्रपटात तिच्यासोबत रजनीश दुग्गल होता. पण हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला ते समजलेच नाही.

श्वेता शिंदेला दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता.. 
बिग बॉसच्या अकराव्या पर्वात सहभागी झालेली अंगुरी भाभी अर्थातच शिल्पा शिंदेलासुद्धा शोमधून बाहेर करण्यात आले होते. भाभीजी घर पर है या मालिकेतून शिल्पा घराघरांत पोहोचली होती. पण लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच शिल्पाचे या मालिकेच्या निर्मात्यांशी खटके उडू लागले होते. निर्मात्यांनी तिला शोबाहेर केले होते. त्यानंतर शिल्पानेने मालिकेच्या निर्मात्यांवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला होता. शिल्पाने ऐनवेळी शूटींगवर येणे बंद केले, फिसमध्ये अनावश्यक वाढ मागितली, तिचे सेटवरचे नखरे वाढले, ही कारणे मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने दिली होती.  

शिल्पा किंवा सोनारिकाच नव्हे तर यापूर्वीही अनेक टीव्ही कलाकारांना निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या कलाकारांना निर्मात्यांनी शो मधून काढून टाकले होते.
 
बातम्या आणखी आहेत...