राज बब्बर आणि प्रतीक
सिनेमांपेक्षा जास्त
आपल्या पर्सनल लाइफने चर्चेत राहणाला बॉलिवूड स्टार प्रतीक बब्बर आज 29वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 28 नोव्हेंबर 1986ला मुंबईमध्ये झाला. प्रतीक अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. प्रतीकला जन्म दिल्यानंतर काही कॉम्पलिकेशनमुळे स्मिता यांचे निधन झाले.
प्रतीकने 2008मध्ये 'जाने तू या जाने ना' सिनेमातून फिल्मी करिअरला सुरुवात केली. सिनेमात त्याने जेनेलिया डिसूजाच्या भावाचे पात्र साकारले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. प्रतीकने, अब तक धोबी घाट, दम मारो दम, आरक्षण, एक दीवाना था आणि इश्कसारख्या सिनेमांत काम केले आहेत.
2011मध्ये आलेल्या 'एक दीवाना था' सिनेमादरम्यान त्याचे को-स्टार एमी जॅक्सनसोबत सुत जुळले होते. प्रतीकने एमीच्या नावाचा टॅटूसुध्दा गोंदवून घेतला होता. परंतु नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
वडिलांपासून दूर, नाही राहिले संबंध-
प्रतीकचे वडील राज बब्बर यांच्यासोबत कधीच पटले नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, की बालपणी त्याच्या वडिलांनी कधीच त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. ते नेहमी आपल्या दुस-या कुटुंबासोबत बिझी असायचे. त्यानंतर प्रतीकने 'बब्बर' आडनाव न लावण्याचासुध्दा निर्णय घेतला. जाणेकरून सर्वांना माहित व्हावे, की त्याचे आणि राज बब्बर यांचे संबंध चांगले नाहीत.
प्रतीक बॉलिवूडमध्ये एकमेव असा अभिनेता नाहीये, ज्याचे आपल्या कुटुंबासोबत पटत नाही. त्याच्याशिवाय अनेत स्टार्स आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कुटुंबापासून दूर किंवा कुटुंबातील काही खास सदस्यांसोबत त्यांचे पटत नाही. प्रतीकच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, अशाच काही स्टार्सविषयी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी ज्यांचे आपल्या कुटुंबासोबत पटत नाही...