आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या नव्या शोची प्रिमियर डेट आली समोर, या शोला करणार रिप्लेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कपिल शर्मा 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' या शोद्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहे. नुकताच त्याच्या शोचा नवा प्रोमो लाँच झाला आहे. त्यात कपिल नाइट सूट परिधान केलेला मोलकरणीबरोबर बोलत असल्याचे दिसत आहे. त्याचा हा शो 25 मार्चपासून सुरू होतोय. 'सुपर डान्सर-2' शोला हा रिप्लेस करणार आहे. 


दूधवाला-पेपरवाला आणि मोलकरणीलाही पैसे देत नाही कपिल 
- व्हिडिओमध्ये जेव्हा कपिल मोलकरणीला न्यूज पेपर आणि चहा मागतो, तेव्हा त्याला ती आधी जुना हिशेब पूर्ण कर असे म्हणते. दूध आणि पेपरवाल्याने उधारी बंद सांगितली आहे, असे तो म्हणतो. 
- कपिल टीव्ही लावताच त्याला बिल न भरल्याने सेवा बंद केल्याचा मॅसेज येतो. 
- मोलकरीणही त्याला पैशाबाबत धमकी देते. पगार दिला नाही म्हणून कामावर येणार नाही असे ती म्हणते. 
- कपिलचा हा नवा शो अत्यंत वेगळा असेल असे सांगण्यात येत आहे. यामध्ये ज्युनियर आर्टिस्ट किंवा स्टेजवर परफॉरमन्ससाठी बोलावली जाणारी ऑडियन्सही नाही. 
- कपिलने 'फिरंगी' या चित्रपटाच्या अपयशानंतर शोसाठी अत्यंत नवीन कॉन्सेप्ट तयार केली आहे. शोसाठी अत्यंत एक्साइटेड असल्याचे तोही सांगतोय. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS

बातम्या आणखी आहेत...