आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या भोळ्या 'भाबीजी..' चा गोव्यात ग्लॅमरस तडका, दिसणार अशा अवतारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘भाबीजी घर पर है’ मधील अंगुरी भाभी आणि अनिता भाभीचा नवा सिझलिंग अवतार लवकरच पाहायला मिळणार आहे. विशेषतः अंगुरी भाभीला पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, मालिकेत भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या भाबीजी याच आहेत. 


दोन्ही भाबीजींशिवाय मनमोहन तिवारी आणि विभूती नारायण मिश्रा अशी मालिकेची संपूर्ण स्टार कास्ट गोवा स्पेशल ट्रॅकमध्ये दिसणार आहे. शूटदरम्यान संपूर्ण कास्टने गोवाच्या मनमोहक समुद्र किनाऱ्यांवर मस्ती केली. विशेषतः अंगुरी भाभी आणि अनिता भाभीचा खास अंदाज आपल्याला सोमवार ते शुक्रवार (5 ते 9 मार्च) रात्री 10.30 वाजता स्पेशल एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. 


प्रेक्षकही जिंकू शकतात गोवा ट्रिप.. 
गोव्याला जाऊन मस्ती करण्याचा आनंद प्रेक्षकांनाही लुटता येणार आहे. त्यासाठी त्यांना 5 ते 9 मार्च म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री 10.30 वाजता 'भाबीजी घर पर है गोवा स्पेशल' एपिसोड्स मधील एका कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल. कॉन्टेस्ट जिंकल्यास गोव्याची ट्रिप बक्षीसरुपात मिळेल. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, गोवा स्पेशल एपिसोड्समधील भाबीजींची ग्लॅमरस झलक..

बातम्या आणखी आहेत...