आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'भाभीजी'च्या विभूती नारायणची मुलगी... पाहा Family चे Unseen Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसिफ त्याची मुलगी मरयमसोबत. - Divya Marathi
आसिफ त्याची मुलगी मरयमसोबत.

मुंबई - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरलेला शो म्हणजे 'भाभीजी घर पर है...' टीव्हीवरील या पॉप्यूलर शोमधील विभूती नारायण मिश्राचा रोल करणारा आसिफ शेख रियल लाइफमध्ये 25 वर्षांच्या मुलीचा आणि 22 वर्षांच्या मुलाचा पिता आहे. आसिफच्या पत्नीचे नाव जेबा असून मुलगी मरयम आणि मुलाचे नाव अलीजाह आहे.  

 

खास मुलाखतीत आसिफने त्याच्या शो आणि रियल लाइफबद्दल दिलखुलास बातचित केली. आसिफ म्हणाला, 'माझी पत्नी जेबा, मुलगी मरयम आणि मुलगा अलीजाह यांना माझ्या कामाचा अभिमान आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात ते माझ्या सोबत असतात. मला सपोर्ट करतात. मी अॅक्टर असल्याने माझ्यावर ऑडियन्सचा दबाव असतो. माझ्या फॅमिलीला माझ्या कामाबद्दल संपूर्ण माहिती आहे हे माझे सौभाग्य आहे. त्यांची कोणतीही तक्रार नसते.'

 

मुलांसोबत असा घालवतो क्वालिटी टाइम 
- आसिफ पर्सनल लाइफबद्दल म्हणाला, 'एक काळ होता जेव्हा मला सलग 8-8 दिवस मुलांपासून दूर राहावे लागत होते. मात्र त्यांनी काहीच तक्रार केली नाही. त्यामुळेच आता मी शुटिंगवर नसतो तेव्हा जास्तीत जास्त वेळ घरीच राहाणे पसंत करतो. आता माझी मुलं मोठी झाली आहेत. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. मला त्यांचा अभिमान वाटतो.'

 

मुलांना अॅक्टिंगमध्ये नाही इंट्रेस्ट 
- आसिफ शेख म्हणाले, लग्नाला 25 वर्षे होऊन गेली आहेत. माझी पत्नी जेबा हाऊसवाइफ आहे. आसिफचे म्हणणे आहे की त्याची मुलगी आणि मुलगा यांना अॅक्टिंगमध्ये जराही रस नाही. मरयम एका टॅलेंट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते. तर मुलगा अलीजाहने इराणी डायरेक्टर माजिद मजीदीसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आसिफच्या फॅमिलीचे Unseen Photos... 

बातम्या आणखी आहेत...