आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भलतीच Bold आहे \'भाभीजी घर पर है\' शो मधील गलफाम कली, पाहा फोटोज्...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - 'भाभीजी घर पर हैं' या शोमध्ये अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे) आणि अनिता भाभी (सौम्या टंडन) शिवाय आणखी एक महिला कॅरेक्टर प्रसिद्ध आहे. ते म्हणजे गुलफाम कली. ही भूमिका अॅक्ट्रेस फाल्गुनी राजाणीने वठवली आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, MBA केल्यानंतर फाल्गुनी थिएटरमध्ये रमली. एका इंटरव्ह्यू मध्ये फाल्गुनीने सांगितले की, हिरोईन बनणारी ती तिच्या कुटुंबातील एकमेव मुलगी आहे.


2005 मध्ये करिअरची सुरुवात..
फाल्गुनीच्या मते तिने अॅक्टींग करिअरची सुरुवात 2005 मध्ये केली होती. गुज्जुभाई नावाच्या गुजराती चित्रपटात ती दिसून आली होती. एक दोन मराठी चित्रपटांतही तिने काम केले होते. 'बडी दूर से आए हैं' शोमध्ये ती इला मौसीची भूमिकाही करते. पण तिला 'भाभीजी घर पर हैं' मधील भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. 'भाभीजी...' च्या चाहत्यांना अंगुरी आणि अनिता भाभी प्रमाणेच गुलफाम कलीही तेवढीच आवडते.


मुंबईत स्वतःचे घर
मुंबईत जन्मलेल्या फाल्गुनीने काही दिवसांपूर्वी कांदिवलीत घर खरेदी केले आहे. मुंबईत तिची आई आणि तिची बहीण तिच्या बरोबर राहते. फाल्गुनीला चित्रपटांत तिची स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. लवकरच ती एखाद्या मोठ्या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. फाल्गुनी लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ग्लॅमरस फोटोशूटही करत असते.


फाल्गुनीच्या फोटोशूटची झलक पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...