आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Karan Patel Wife Ankita Bhargava Suffers Miscarriage TV अॅक्ट्रेसचा गर्भपात, चार महिन्यांची प्रेग्नेंट होती \'ये है मोहब्बतें\' फेम करण पटेलची पत्नी

TV अॅक्ट्रेसचा गर्भपात, चार महिन्यांची प्रेग्नेंट होती \'ये है मोहब्बतें\' फेम करण पटेलची पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ये है मोहब्बतें' फेम करण पटेलची पत्नी अंकिता भार्गव हिचा गर्भपात झाला आहे.  ती चार महिन्यांची गर्भवती होती. अंकिताचे वडील आणि अभिनेते अभय भार्गव यांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला ही बातमी दिली. याविषयावर अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. 20 जून रोजी अंकिताचे मिसकॅरेज झाल्याचे समजते. 


नोव्हेंबर महिन्यात होणार होती अंकिताची डिलिव्हरी...

- अंकिताची डिलिव्हरी नोव्हेंबर महिन्यात होणार होती. हे अंकिता आणि करण यांचे पहिले अपत्य होते. बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्याने हे दोघेही आनंदात होते. याचवर्षी एप्रिल महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून करणने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. त्याने आपला आनंद व्यक्त करताना लिहिले होते. "अंकिता भार्गव आणि माझ्यासाठी नोव्हेंबर महिन्यात मोठा सण येतोय. त्यासाठी मी एवढा एक्साइटेड आहे, की प्रतिक्षा केली जात नाहीये."

 

पहिल्यांदा आई होणार होती अंकिता...  
- अंकिता आणि करणचे 3 मे 2015 रोजी मुंबईत लग्न झाले होते. अंकिता पहिल्यांदा आई होणार होती. अलीकडेच झालेल्या गोल्ड अवॉर्ड सोहळ्यात अंकिता करणसोबत पोहोचली होती. पिंक गाऊनमधून तिचे बेबी बंप फ्लॉन्ट झाले होते.  अंकितासुद्धा एक अभिनेत्री असून तिने 'संजीवनी' (2002), 'देखा एक ख्वाब ' (2011-12) आणि 'रिपोर्टर्स'(2013) या मालिकांमध्ये काम केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...