आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून अशी दिसते कपिल शर्माची नवी लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, पाहा खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच नवीन शो 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' द्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो समोर आला होता. आता त्याच्या नव्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो समोर आले आहेत. कपिलने स्वतः त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, 'My new vanity van designed by DC'. याशिवाय त्याने एक फोटो शेअर करत लिहिले, 'Make up room..'. मात्र अद्याप कंपनीने ही व्हॅनिटी व्हॅन कपिलला दिलेली नाही. 


6 महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करतोय कपिल  
कपिल शर्माच्या नव्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही लक्झरी व्हॅन डीसी द्वारे डिझाइन करण्यात आली आहे. कपिल शर्मा 6 महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करत आहे. डिप्रेशनमुळे कपिलला त्याचा कॉमेडी शो बंद करावा लागला होता. व्यसन सोडवण्यासाठी त्याने बेंगळुरूमध्ये उपचारही घेतले होते. कपिल ज्या नव्या शोद्वारे टिव्हीवर पुनरागमन करत आहे, त्यात कोणकोणते स्टार्स असतील, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. याच महिन्यात हा शो सुरू होणार असल्याची चर्चा आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, कपिल शर्माच्या नव्या व्हॅनिटी व्हॅन आणि त्याच्या नव्या शोचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...