आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV बघायला आईवडील रागावत असतील, तर सांगा \'हा\' शो बघतोय... मग काय होतं सांगतोय SRK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्टार प्लसने 10 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता त्यांचा लिमिटेड एडिशन शो 'TED Talk India नई सोच' लाँच केला. या शोमध्ये नव्या कल्पनांवर आधारित काही अशा कथा प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या ज्या प्रेरणादायी तर आहेतच; पण त्यामुळे मेंदूवर चढलेला गंज पुसला जातो आणि नव्या विचारांची (नई सोच) प्रेरणाही मिळते.  
 
नई सोच आणि स्टार प्लसने TED Talks च्या माध्यमातून जीवनातील प्रेरणादायी कथांची ही सुरुवात केली आहे. ‘TED Talk’हा  मुळात इंग्लिश शो आहे. स्टार प्लसने प्रथमच हिंदीच्या प्रेक्षकांसाठी तो आणला आहे. या शोचा होस्ट शाहरुख खान आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये शाहरुखने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवले. शोमध्ये सहभागी झालेल्या वक्त्यांनी वैविध्यपूर्ण आणि युनिक आयडियाजवर चर्चा केली. त्यातून भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळाली. रोज नव्या विचाराने जीवन जगण्यावर विश्वास करणारे हे लोक आहेत. एका वक्त्याने शहरांमध्ये जंगल लावण्याची कल्पना सुचवली, तर कोणी विज्ञानाला आपण सहजपणे जीवनातील एक भाग कसा बनवू शकतो, हे सांगितले. 
 
हा शो दर रविवारी सायंकाळी 7 वाजता स्टार प्लसवर टेलिकास्ट केला जाईल. आगामी काही शोमध्ये प्रेक्षकांना आणखी अशाच नवनवीन कल्पना पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, का पाहायला हवा ‘TED Talk India नई सोच’
बातम्या आणखी आहेत...