आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात अशी झाली TV मालिकांची सुरुवात, सासासुनांच्या ड्रामापूर्वी हिट होते हे 10 शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील पहिली टीव्ही मालिका 'हम लोग' - Divya Marathi
भारतातील पहिली टीव्ही मालिका 'हम लोग'


मुंबईः आज टीव्हीवर आपण रिअॅलिटी शोजपासून कॉमेडी, ड्रामा आणि क्राइमसह अनेक सीरिअल्स बघत असतो. पण या टीव्ही शोची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला ठाऊक आहे का? या टीव्ही शोजची संकल्पना 1980 च्या दशकात आली होती. भारतातील पहिली मालिका पी. कुमार वासुदेव दिग्दर्शित 'हम लोग' ही होती. ही मालिका त्याकाळात दुरदर्शनवर प्रसारित झाली होती. या मालिकेत सासूसुनेचा फॅमिली ड्रामा नव्हता, तरीदेखील ही मालिका हिट झाली होती. त्याकाळात 'हम पांच' ही सर्वाधिक काळ चालणारी पहिली मालिका ठरली होती. 


अशी पुढे आली टीव्ही शोची कल्पना...
- 'हम लोग' या पहिल्या मालिकेची कल्पना 1975 मध्ये आलेल्या मेक्सिकन टेलिव्हिजन सीरीज 'Ven Conmigo'वरुन सुचली होती. 
- भारतातील टीव्हीचे जग 'ब्लॅक अँड व्हाइट'मधून रंगांच्या दुनियेत नेणारे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री वसंत साठे यांना ही कल्पना सुचली होती. ते 1982 साली मेक्सिकन दौ-यावर गेले होते.
- तेथून परतल्यानंतर त्यांनी लेखक मनोहर श्याम जोशी यांची भेट घेतली  आणि त्यांना मालिकेसाठी स्क्रिप्ट लिहिण्यास सांगितली. या मालिकेचे शीर्षक 'हम लोग' असे ठेवण्यात आले. या मालिकेचे एकुण 156 एपिसोड प्रसारित झाले होते. दिग्दर्शक पी. कुमार. वासुदेव यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
- 'हम पांच' ही पहिली टीव्ही मालिका आहे, ज्यात सासूसुनांमधील भांडण, कौटुंबिक ड्रामा नसूनदेखील घराघरांत वेगळी ओळख निर्माण केली आणि मालिका सुपरहिट ठरली. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच 10 जुन्या मालिकांविषयी सांगतोय, ज्यात सासूसुनांचा फॉर्मुला नसूनदेखील त्या हिट ठरल्या होत्या. 


या मालिकांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...