आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:नव-याच्या खांद्यावर बसून 'नागिन'ची अभिनेत्री अनिताने केला वर्कआउट, व्हायरल होतोय व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कलर्स टीव्हीचा प्रसिध्द शो 'नागिन'ची अभिनेत्री अनिता हसनंदानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अनिता ही पती रोहन रेड्डीच्या खांद्यावर बसलेली दिसतेय. तर रोहित वर्कआउट करताना दिसतोय. अनिताही हाय-पाय हलवताना दिसतेय. रोहितने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने फोटोला "अनिता हसनंदानी के साथ कुछ ग्रेट फिटनेस कंटेंट के लिए अब और ज्यादा इंतजार नहीं कर सकता" असे कॅप्शन दिले आहे.


1.75 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ
व्हिडिओमध्ये अनिता म्हणते की, - "पाहा मी किती वर्कआउट करते. मी वर्कआउटशिवाय राहूच शकत नाही. मला जिम करायला खुप आवडते." यानंतर रोहित अनिताला खांद्यावर घेऊनच बाहेर निघतो तर अनिता बाय बोलते. हा व्हिडिओ रोहितने शेअर केला. काही तासातच या व्हिडिओला 1 लाख 75 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.


2013 मध्ये बिझनेसमन रोहितसोबत लग्न

अनिता आणि रोहित एकाच जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी जात होते. अनिता रोहितला पहिल्यांदा येथे भेटली होती. दोघांची मैत्री झाली आणि नंतर या कपलने एकत्र पब पार्टीत जाणे सुरु केले. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अनिताने 14 ऑक्टोबर 2013 ला आपल्या तेलुगु बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. रोहित बिझनेसमन आहे त्याचा बिझनेस गोव्यामध्ये आहे. काव्यांजली(2005-06) च्या सेटवर अनिता आणि अॅक्टर एजाज खानच्या अफेअरच्या चर्चा होत्या. परंतू काही वर्ष डेटिंगनंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. 

 

हे टीव्ही शोज आणि चित्रपटांतून प्रसिध्द झाली अनिता
अनिताने मॉडलिंगमध्ये यशस्वी करिअर बनवले. यासोबतच तिने  'कभी सौतन कभी सहेली' (2001) मालिकेतून टीव्हीमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 'काव्यांजली', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से', 'ये है मोहब्बतें' मध्ये काम केले. सध्या ती 'नागिन 3'मध्ये दिसतेय. तिने  'कुछ तो है' (2003), 'ये दिल' (2003), 'कृष्णा कॉटेज' (2004), 'सिलसिले' (2005), 'रागिनी एमएमएस- 2 (2014), हीरो (2015)  सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...