आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस' फेम रोशेल-कीथने केले सीक्रेट मॅरेज, समोर आले Wedding Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस'च्या नवव्या पर्वात झळकलेले सेलिब्रिटी कपल रोशेल राव आणि कीथ सेकुरा लग्नगाठीत अडकले आहेत. दोघांनी 3 मार्च रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुपचुप लग्न थाटले. तामिळनाडूच्या महाबलिपुरम येथे बीचवर हा लग्नसोहळा पार पडला. लग्नात कुटुंबीय आणि मोजके फ्रेंड्स सहभागी झाले होते. कीथने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाची बातमी दिली. 


गेल्यावर्षी झाला होता साखरपुडा...  
दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रोशेल आणि कीथ यांनी गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. रोशेलचे बीचवर लग्न थाटण्याचे स्वप्न होते. कीथने तिचे हे स्वप्न पूर्ण केले. लग्नाचे अनेक फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या या लग्नात रोशेलने व्हाइट कलरचा गाऊन परिधान केला होता. तर कीथ लाइट ब्लू कलरच्या सूटमध्ये दिसला. 


पुढील स्लाईड्सवर बघा, रोशल आणि कीथ यांच्या लग्नाचे निवडक फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...