आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला 'डान्स दीवाने' चा प्रोमो, माधुरीच्या गाण्यावर सलमानने केला धमाकेदार Dance

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कलर्स चॅनलवर डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दीवाने' 2 जूनपासून रिलीज होणार आहे. या शोची जज माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि शशांक खेतान आहेत. शोचा प्रोमो शनिवारी समोर आला. यामध्ये दाखवले की, 'रेस-3' ची टीम फिल्मचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली. प्रमोशन दरम्यान सलमान खान सर्वात   जास्त मस्ती मूडमध्ये दिसला. त्याने शोच्या कंटेस्टेंटसोबत फूल धमाल केली. एका कंटेस्टेंटसोबत त्याने 'किक' मधील गाणे 'जुम्मे की रात है...' वर डान्स केला. यासोबतच 'मुझसे शादी करोगी' चे गाणे 'जाए जाए एक बार जवानी...' वर त्याने एका मुलासोबत डान्स केला.  यासोबतच सलमानने माधुरी दीक्षितच्या 'याराना' चित्रपटातील 'मेरा पिया घर आया...' वर डान्स केला. सलमानसोबत जॅकलीन फर्नांडिज, अनिल कपूरही होते. या शोमधून माधुरी 2 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करत आहे. यापुर्वी तिने झलक दिखलाजा डान्स रिअॅलिटी शो जज केला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सलमानचा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...