आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video Viral: 'डॉ. हाथी'ला शेवटचा निरोप देताना ऑनस्क्रीन मुलगा 'गोली' झाला इमोशनल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे डॉ. हंसराज हाथी म्हणजेच कुमार आजाद यांच्यावर मंगळवारी मुंबई येथील मीरा रोड येथील स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देताना शोमधली सर्व कलाकार उपस्थित होते. मालिकेत त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारा गोली म्हणजेच कुश शाह अंत्यसंस्कारावेळी इमोशनल झाला. त्याने अश्रू लपवण्याचा पुर्ण प्रयत्न केला, परंतू त्याच्या चेह-यावर ऑनस्क्रीन वडिलांना गमावण्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. त्याचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.


- कुश गेल्या 9 वर्षांपासून या मालिकेत डॉ. हाथीच्या मुलाची भूमिका साकारत आहे. या काळात कवी कुमार आजाद यांच्यासोबत त्याची जबरदस्त बॉन्डिंग झाली होती. 9 जुलै रोजी हार्ट अटॅकने आजाद यांचे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...