आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

last scene: 'डॉ. हाथी'चा मालिकेतील शेवटचा सीन, 7 जुलैला सीन शूट झाला 2 दिवसात निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत 'डॉ. हंसराज हाथी'ची भूमिका साकारणारे कवी कुमार आजाद आता या जगात नाहीत. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. डॉ. हाथीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. हाथी शोच्या इतर स्टार्ससोबत दिसत आहेत. या व्हिडिओमधील सीन हा डॉ. हाथीचा शेवटचा सीन आहे. या सीनमध्ये ते शेवटच्यावेळी कॅमेरासमोर आले होते. या सीनमध्ये दाखवण्यात आले आहे की, गोकुलधाम सोसायटीचे लोक बापूजीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. त्यांचा मुलगा जेठालाल देशात नाही. बापूजीने स्वप्न पाहिले की, जेठालाल 100 कोटींचे लोन घेऊन देशातून पळून गेला आहे. हे स्वप्न पाहिल्यानंतर बापूजी खुप टेंशनमध्ये येतात. हा सीन 7 जुलैला शूट झाला होता आणि 9 जुलैला डॉ. हाथीचे निधन झाले होते. 
शोमध्ये बबिताची भूमिका साकारणा-या मुनमुन दत्ताने आपल्या इंस्टाग्रामवर डॉ. हाथीचा शेवटचा सीनचा फोटो शेअर केला आहे. रिपोर्ट्सनुसार अजून काही एपिसोड्समध्ये डॉ. हाथी दिसतील. यानंतर त्यांची भूमिका कोण साकारेल हे सध्या ठरलेले नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...