आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे पार्थिव पाहून ढसाढसा रडले कुमार आझाद यांचे वडील, भाऊ आणि काकांनी केले अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील डॉ. हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे सोमवारी हार्टअटॅकने निधन झाले. कवी कुमार यांच्यावर मंगळवारी सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार होणार होते, परंतु मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुमार आझाद यांचे पार्थिव उशिरा घरी पोहोचले. मीरा रोड स्थित स्माशानभूमीत कवी कुमार आझाद यांच्यावर भाऊ आणि काकाने अंत्यसंस्कार केले. लग्नासाठी बिहारला गेलेले आझाद यांचे कुटुंबीयसुद्धा घरी परत आले. मुलाचे पार्थिव पाहून आझाद यांचे वडील ढसाढसा रडले.


अंत्यदर्शनासाठी पोहचला मित्र परिवार : कुमार आझाद यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तारक मेहता टीममधील तारक यांची ऑनस्क्रीन पत्नी नेहा मेहता, कवी कुमार यांची ऑनस्क्रीन पत्नी अंबिका रंजनकर, जेनिफर मिस्त्री बंसीवाल, भव्य गांधी, निधी भानुशादील, प्रोड्युसर असित मोदी पोहचले होते.


डायरेक्टरला म्हणाले होते -तब्येत खराब असल्यामुळे आज शूटवर जाऊ शकणार नाही : 46 वर्षीय कुमार आझाद यांनी सोमवारी सकाळी हृदयामध्ये त्रास झाला. त्यानंतर त्यांना मुंबईच्या वॉकहार्ट हॉस्पिटल नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आझाद मुंबईतील मीरा रोड भागात आई-वडील, मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...