आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV Show:पालकांच्या आठवणीत रडली माधुरी दीक्षित, दिवंगत वडिलांच्या आयुष्यातील उलगडले रहस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : माधुरी दीक्षितने आपल्या पालकांविषयी काही गोष्टी शेअर केल्या. नुकतीच 'डान्स दीवाने' च्या शोमध्ये ती पालकांच्या आठवणीत भावूक झाली. तिने या शोमध्ये पालकांविषयी सांगितले. ती म्हणाली "माझे वडील 8 वर्षांचे होते तेव्हापासून त्यांना ऐकायला येणे बंद झाले होते. आम्ही डान्स करत होतो, तेव्हा ते तिथे येऊन बसायचे. माझे वडील आणि आई दोघांनी आम्हाला सपोर्ट केला. दोघंही माझी स्ट्रेंथ राहिले आहेत, माझे पिलर राहिले आहेत." हे बोलत असतानाच तिला अश्रू अनावर झाले. माधुरीचे वडील शंकर दीक्षित हे इंजीनियर होते. 2013 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


आईने चाल मुलं असताना पुर्ण केले एमए
माधुरीने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, आई (स्नेहलता दीक्षित) तिच्या रोल मॉडल आहेत. माधुरीनुसार स्नेहलतांचा जन्म खेड्यात झाला. लग्नानंतर त्या शहरात आल्या. त्या शुध्द शाकाहारी होत्या. तर वडिलांना नॉनव्हेज आवडायचे. तेव्हा आईने नॉनव्हेज खाणए सुरु केले आणि तयार करणे शिकले. माधुरीने सांगितले की, माझ्या आईला चार मुलं असतानाही तिने वोकल मध्ये एमएक डिग्री घेतली होती. माधुरीसोबत शंकर आणि स्नेहलता यांना तीन आपत्य आहेत. (मुली रुपा, भारती आणि मुलगा अजीत) माधुरीप्रमाणेच रुपा आणि भारतीही ट्रेंड कत्थक डान्सर आहेत. भाऊ अजीत हा यूएसमध्ये राहतो. 

बातम्या आणखी आहेत...