आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Rubina Dilaik Sangeet Ceremony Inside Photos: Hussain Kuwajerwala Tina And Sharad Kelkar To Surveen Chawana Attend

Inside Photos+Video : संगीत सेरेमनीत 'किन्नर बहू'ने केला डान्स, थिरकले TV सेलिब्रिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'छोटी बहू', 'पुनर्विवाह', 'देवों के देव: महादेव', 'शक्ति- अस्तित्व के एहसास की', 'ससुराल सिमर का' या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री रुबीना दिलाइक 21 जून रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्न थाटत आहे. दोघांचे लग्न शिमला येथील प्रसिद्ध वुडविल पॅलेसमध्ये पंजाबी आणि हिमाचल पद्धतीने होणार आहे. बुधवारी रुबीना आणि अभिनव यांची मेंदी, साखरपुडा आणि संगीत सेरेमनी पार पडली. दोघांच्या संगीत सेरेमनीचे काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यामध्ये रुबीना तिच्या फ्रेंड्ससोबत मस्ती करताना दिसतेय.

 

लग्नात येणार नाही ऑनस्क्रिन सासू.. 
 'शक्ति- अस्तित्व के एहसास की' या मालिकेत रुबीनाच्या सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री काम्या पंजाबी या लग्नात सहभागी होणार नाही. तिने व्हिडिओ पोस्ट करुन लग्नात सहभागी राहू शकत नसल्याबद्दल रुबीनाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. पण रिसेप्शन पार्टीत हजर राहणार असल्याचे तिला सांगितले. रुबीनाच्या संगीत सेरेमनीत शरद केळकर, कीर्ती गायकवाड, हुसैन कुवजेरवाला, टीना कुवजेरवाला, सुरवीन चावलासह अनेक सेलेब्स सहभागी झाले. त्यांनी यावेळी डान्स परफॉर्मन्सही दिला. लग्नानंतर 24 जून रोजी लुधियाना आणि 28 जून रोजी मुंबईत दोघांचे रिसेप्शन होणार आहे.

 

या शोमध्ये काम करत आहे रुबीना...
रुबीना याकाळात 'शक्ति : अस्तित्व के अहसास' या मालिकेत तृतीयपंथीयची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर अभिनव शुक्ला 'सिलसिला बदलते रिश्तों का' या मालिकेत व्हिलनच्या भूमिकेत झळकतोय.


पुढील स्लाईड्सवर बघा, संगीत सेरेमनीचे इनसाइड फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...