आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरातीत डान्स करत पोहोचला 'सिमर' चा नवरदेव, नवरीला कडेवर घेऊन केला डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ससुराल सिमर का' या मालिकेतील सिमर अर्थातच दीपिका कक्कडने परंपरागत पध्दतींने बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत लग्न केलेय. या कपलचे वेडिंग फोटोज आणि व्हिडियोज नुकतेच समोर आले आहेत. यामध्ये शोएब डान्स करताना दिसतोय. यावेळी तो सलमान खानचे गाणे 'चल प्यार करेगी' यावर डान्स परफॉर्मेंस देताना दिसला. यावेळी त्याने दीपिकाला खांद्यावर उचलून घेतले. येवढेच नाही तर त्यांनी बॅक टू बॅक दोन गाण्यांवर डान्स केला. 

मुंबईमध्ये होईल रिसेप्शन...


-  या कपलचे इंटरकास्ट मॅरेज आहे. यामुळे ते दोघं मुस्लिम आणि हिंदू दोन्हीही पध्दतींनी हळदीपासून लग्नापर्यंतच्या सर्व प्रथा पुर्ण करणार आहेत.
- कपलचे लग्न आणि रिसेप्शन 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये होईल. सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. यामध्ये इंडस्ट्रीचे सर्वच सेलेब्स सहभागी होणार आहेत.
- या दोघांची भेट 'ससुराल सिमर का' (2011) या टीव्ही सीरियलमध्ये झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली. हे दोघं 2013 पासून एकमेकांना डेट करत आहेत. शोएबने फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीत दीपिकाला 'नच बलिए' (2017) च्या सेटवर लग्नासाठी प्रपोज केले होते.

दीपिका-शोएबचे डेस्टिनेशन वेडिंग झाले
- दीपिका-शोएबचे डेस्टिनेशन वेडिंग लखनऊपासून 100 किलो मीटर अंतरावर असलेल्या मौदाहामध्ये झाले.
- शोएब हा फॅमिलीसोबत भोपाळमध्ये राहतो. परंतू त्यांच्या पूर्वजांचे घर उत्तरप्रदेशमध्ये असल्यामुळे येथून लग्न करण्यात आले.
- या कपलने मिळून डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान केला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शोएब-दीपिकाच्या लग्नातील फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...