आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 40 व्या वर्षी बोहल्यावर चढला \'सरस्वतीचंद्र\', नाचत पोहोचला नववधुकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेता गौतम रोडेने आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड पंखुडीसोबत लग्न केले आहे. दोघांनी सोमवारी अलवर, राजस्थानमध्ये कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न केले. दोघांचे फोटोज आणि व्हिडओ समोर आले आहेत. यामध्ये हे कपल एकत्र सुंदर दिसत आहेत. तसेच लग्नात गौतम डान्स करतानाही दिसतोय. गौतम पंखुडीपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. या टीव्ही शोच्या सेटवर सुरु झाली होती लव्ह-स्टोरी...


- गौतमने पंखुडीला लग्नासाठी प्रपोज केले होते आणि पंखुडी हो म्हणाली होती.
- कुटूंबीयांनी होकार दिल्यानंतर पंखुडीने गौतमच्या घराजवळ आपले घर शिफ्ट केले. 
- गौतम आणि पंखुडीची पहिली भेट सोनी टीव्हीचा शो 'सूर्यपुत्र कर्ण' (2015) च्या सेटवर झाली होती.
- या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांत प्रेमात झाले. या शोमध्ये गौतमने कर्णाची भूमिका केली होती तर पंखुडीने द्रौपदीची भूमिका केली होती.


यांच्यासोबत जोडले आहे गौतमचे नाव
- गौतमची लव्ह स्टोरी यापुर्वीही चर्चेत राहिली आहे.
- यापुर्वी त्याचे नाव 'सरस्वतीचंद्र' मध्ये त्याच्यासोबत काम करणा-या जेनिफर विंगेटसोबत जोडले गेले आहे.
- अशा बातम्या आल्या होत्या की, जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हरच्या घटस्फोटानंतर दोघेही जवळ आले होते.
- यानंतर त्याचे नाव श्रेध्दा आर्यासोबत जोडले गेले होते.

 

पंखुडीने केलेय या टीव्ही शोजमध्ये काम
- पंखुडीने आपल्या करिअरची सुरुवात 'ये है आशिकी' (2013) मधून केली होती.
- यानंतर ती 'MTV फना' (2014), 'रजिया सुल्तान' (2015), 'सूर्यपुत्र कर्ण'(2015) सारख्या शोजमध्ये दिसले आहे.

- पंखुडी सध्या 'क्या कुसूर है अमला का' मध्ये काम करत आहे.

 

गौतमने केले या शोजमध्ये काम
- गौतमने आपल्या करिअरची सुरुवात 1995 मध्ये 'जहा प्यार मिले' मधून केली होती.
- यानंतर तो 'रिश्ते'(2000), 'अपना अपना स्टाइल'(2001), 'बा बहू और बेबी'(2005), 'इंतेजार'(2008), 'आहट'(2010), 'परिचय'(2011), 'सरस्वतीचंद्र'(2013), 'सूर्यपुत्र कर्ण'(2015) सारख्या टीव्ही शोमध्ये दिसला आहे.
- टीव्ही शोज व्यतिरिक्त गौतमने  'अनर्थ'(2002), 'यू-बोमसी एंड मी'(2005), 'अज्ञात'(2009) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
- तो सध्या जरीन खानसोबत अगामी चित्रपट 'अक्सर-2' ची शूटिंग करतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थीचा WEDDING ALBUM... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा लग्नाचा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...