आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा साजरा झाला एकता कपूरचा वाढदिवस, वडील जितेंद्रसोबत दिल्या पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही क्वीनच्या नावाने प्रसिध्द असलेल्या एकता कपूरने बांद्राच्या एका रेस्तरॉमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. पार्टीमध्ये फॅमिली आणि टीव्ही सेलेब्स सहभागी झाले. पार्टीमध्ये एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर, वडील जितेंद्र आणि आई शोभा कपूरही दिसल्या. परंतू यामध्ये तुषार कपूरचा मुलगा लक्ष दिसला नाही. सेलिब्रेशन दरम्यान एकताचे वडील जितेंद्र यांनी खुप पोज दिल्या.


पार्टीमध्ये या ड्रेसमध्ये पोहोचली एकता
- एकता कपूर आपल्या बर्थडे पार्टीमध्ये ब्लू कलरच्या वन ऑफ शोल्ड शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तिची मैत्रिण मोना सिंह ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये स्पॉट झाली. टीव्हीची नागिन म्हणजेच अनिता हसनंदनी ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली.
- पार्टीमध्ये जितेंद्र ब्लॅक शर्ट आणि पँटमध्ये तर शोभा ब्लू कलरच्या सलवार-सूटमध्ये दिसली.
- एकताने वडिलांसोबत केक कापला.

 

वयाच्या 17 वर्षे केली होती करिअरची सुरुवात
- वयाच्या 17 व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये पाउल ठेवणा-या एकताने 70 पेक्षा जास्त मालिकांची निर्मिती केली आहे.
- एकता कपूर बालाजी टेलीफिल्म्सची जॉइंट मेनॅजिंग डायरेक्टर आहे.
- एकताला चॉकलेट्स आवडतात. तिच्या घरातील फ्रिज चॉकलेट्स बार आणि चॉकलेट्स आइस्क्रीमने भरलेले असते.


टीव्हीच्या या मालिकांमुळे मिळेवली प्रसिध्द
एकता कपूरने आपल्या सासू-सुनेच्या मालिकांमध्ये खुप पैसा कमावला. तिच्या प्रोडक्शन बॅनरखाली  'हम पांच', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं किसी रोज', 'कभी सौतन कभी सहेली', 'कहीं तो होगा', 'किस देश में है मेरा दिल', 'कसम से', 'कुमकुम', 'कुटुम्ब', 'बंदिनी', 'बड़े अच्छे लगते हैं', 'जोधा अकबर', मेरी आशिकी तुमसे ही, 'ये है मोहब्बतें' सारख्या मालिकांचा समावेश आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कुमकुम' आणि 'कहानी घर-घर की' मालिकांमधून एकता घरा-घरात प्रसिध्द झाली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा एकताच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...