आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसला समजायचे माधुरी दीक्षित, मजबूरीत सोडावी लागली इंडस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 वर्षानंतर निक्की अनजे इंडस्ट्रीमध्ये परत येत आहे. - Divya Marathi
11 वर्षानंतर निक्की अनजे इंडस्ट्रीमध्ये परत येत आहे.

मुंबई/लखनऊ - माधुरी दीक्षितची 'हमशक्ल' म्हटली जाणारी निक्की अनेजा 11 वर्षानंतर टेलिव्हिजवर परतली आहे. 'इश्क गुनाह' शोमधून निधी कमबॅक करत आहे. या शोमध्ये निक्की 'लैला राय चंद'च्या रोलमध्ये आहे. शोच्या प्रमोशनासाठी निक्की नुकतीच उत्तर प्रदेशच्या राजधानीत आली होती. यावेळी DivyaMarathi.Com सोबत केलेल्या दिलखुलास बातचीतमध्ये निक्कीने पर्सनल आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा केल्या. 

 

अॅक्ट्रेस नाही, पायलट होण्याची होती इच्छा 
- निक्की म्हणाली की 1992 ला मी मॉडेलिंग शोध्ये पार्टिसिपेट केले होते. त्या शोचे नाव होते मिस यूनिव्हर्सिटी. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. शोच्या ग्रुमिंगसाठी मला कोरियाला पाठवण्यात आले. त्या स्पर्धेत मी सेकंड रनरअप राहिले होत.

- येथूनच माझी अॅक्टिंग करिअरची जर्नी सुरु होते, वास्तविक मला कधीही अॅक्ट्रेस होण्याची इच्छा नव्हती. मला पायलट बनायचे होते. त्यासाठी मी मुंबईतील क्लाइंग क्लबमध्ये अॅडमिशनही घेतले होते. 72 तास मी मुंबईत फ्लाइंग देखील केले आहे. पुढील कोर्ससाठी मला टेक्सासला जाण्याची इच्छा होती, मात्र त्यासाठीचा फंड देण्यास वडिलांनी नकार दिला. 

- वडील म्हणाले, आम्ही कोणतेही रिस्क घेऊ शकत नाही, आणि माझे स्वप्न स्वप्नच राहिले. त्यानंतर मी माझा भाऊ परमीत सेठीकडे गेले. तो अॅक्टिंगसाठी मला नेहमी प्रोत्साहन देत होता. तु सुंदर आहे, उंच आहे. तु अॅक्टिंग केली पाहिजे, असे तो मला नेहमी म्हणत होता. आणि मी प्रत्येकवेळी नकार देत असायचे. 
- त्या नंतर मी माझा पोर्टफोलियो तयार करुन घेतला. मी मॉडेलिंग यासाठी सुरु केले, जेणे करुन त्यातून पैसे कमावून मला अमेरिकाला फ्लाइंट ट्रेनिंग पूर्ण करता येईल. 
- मी एक पोर्टफोलियो तयार केलाच तर दुसऱ्या पोर्टफोलियोची ऑफर आली. पहिल्या अॅडसाठी मला 8 हजार रुपये मिळाले. त्यानंतर अॅड साइन करणे सुरु झाले. पैसेही चांगले मिळायला लागले. अॅडच्या निमित्ताने फिरायला मिळायला लागले. मी मॉडेलिंगच्या प्रेमातच पडले. फक्त मला मेकअप आवडत नव्हता. 

 

मजबूरीत सोडावी लागली इंडस्ट्री... 
- 'मी फिल्मी बॅकग्राऊंडमधूनच होते, माझ्या वडीलांचा अंधेरीमध्ये एक स्टुडिओ होता, त्याचे नाव सेठ स्टुडिओ. त्याकाळात एअर कंडिशन असलेला तो एकमेव स्टुडिओ होता.'
- एक दिवस मला पहलाज निहलानी यांचा कॉल आला त्यांनी त्यांच्या फिल्मसाठी मला विचारणा केली. मी वडिलांना विचारले तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, मी ही इंडस्ट्री जवळून पाहातो. ही इंडस्ट्री तुझ्यासाठी चांगली नाही. मात्र मी पापाला विनंती केली की मला एक संधी द्या, जर मला ही इंडस्ट्री कळाली नाही तर सोडून देईल. 
- माझा पहिला चित्रपट 'मिस्टर आझाद' होता. पहिल्याच चित्रपटात माझ्यावर माधुरीची 'हमशक्ल' असल्याचा शिक्का मारला गेला. 
- त्यानंतर मला यस बॉसची ऑफर मिळाली होती. त्याच दरम्यान वडिलांचे निधन झाले. मी सरळ यस बॉसचे प्रोड्यूसर रतन जैन यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटले की सर, तुम्ही तुमचे पैसे परत घ्या, मी फिल्म नाही करु शकत. 
- ते म्हणाले, लवकरच शूटिंग सुरु होणार आहे, असे करु नको. तुझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे. मात्र फिल्म न करण्याचे मी नक्की केलेले होते. वडिलांच्या जाण्याने मला एकटे-एकटे वाटत होते. मला स्वतःला असुरक्षित वाटत होते. माझ्यासोबत काही बरे-वाईट झाले तर, अशी भीती वाटत होती.
- मी ऐकून होते की फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच, हॅरेसमेंट असे खूप प्रकार होतात. माझ्यासोबत असे काही झाले नाही कारण माझ्यासोबत माझे वडील होते. काही बरे-वाईट होण्याआधी मी इंडस्ट्री सोडली.     

 

आयुष्यातील प्राऊड मोमेंट.. 

निक्की अनेजाने सनी वालियासोबत लग्न केले असून आता जुळ्या मुलांची आई आहे. जुळी मुले झाली तो क्षण माझ्या आयुष्यातील प्राऊड मोमेंट होता, असे निक्की सांगते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, निक्की अनेजाचे काही निवडक फोटो... 
 

बातम्या आणखी आहेत...