आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divorce नंतर सचिनने सोडले मौन, म्हणाला - जूहीने माझ्यावर कधी प्रेमच केले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: टीव्ही शो 'कुमकुम' फेम जूही परमारने पती सचिन श्रॉफसोबत 25 जून 2018 रोजी घटस्फोट घेतला. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. आता वेगळे झाल्यानंतर सचिनने पहिल्यांदा मौन सोडले आहे. त्यांने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जूहीला माझ्यावर कधीच प्रेम नव्हते. सुरुवातीपासूनच हे एकतर्फी रिलेशनशीप खुप दुर्दैवी होते. मी लव्ह लेस लग्नाचा भाग राहिलो याचे मला खुप दुःख आहे. जुहीला माझ्यावर प्रेम होईल असे मी काहीच करु शकलो नाही."


जूही म्हणाली होती की, दबावात केले होते लग्न 
घटस्फोटानंतर जूहीने चॅट शो 'जज्बात'मध्ये म्हटले होते की, - "सचिन माझ्यावर प्रेम करायचा आणि आम्ही लवकरच लग्न केले. पर्सनली मी तेव्हा पुर्णपणे कनविंस नव्हते. मला असे वाटत होते की, मी त्याच्यावर प्रेम करतेय परंतू लग्नाच्या डिसीजनपर्यंत पोहोचले नव्हते. त्याच्या दबावामध्ये मला लग्न करावे लागले."
- जूहीनुसार "लग्नाच्या काही वर्षांनंतरच आमच्या भांडण सुरु झाली. आमचे लग्न सुरळीत सुरु नाही हे मी स्विकार करु शकत नव्हते. अशा वेळी फायनली वेगळे होणे हाच शेवटचा पर्याय होता."

- सचिनने मुलाखतीत पुढे सांगितले की, "आता मी पुर्णपणे रियालिस्टिक झालो आहे. मला समजले आहे की, रिलेशनशीपसाठी प्रेम नेहमी दोन्हीकडून असायला हवे. मी एखाद्या दूसर रिलेशन किंवा लग्नाविषयी विचार करणे खुप घाई होईल. हा काळ माझ्यासाठी खुप भावनिक आहे. कारण मी खरंच खुप प्रेमात होतो."


जूही सांभाळणार मुलीची जबाबदारी
जूहीने सचिनकडून कोणतीही पोटगी मागितलेली नाही. मुलगी समाइराची कस्टडी जूहीला मिळाली आहे. सचिन तिला भेटायला येत राहिल. जूही आणि सचिनने 2009 मध्ये लग्न केले होते. परंतू दोन वर्षांनंतरच त्यांचे नाते बिघडत होते. त्यांच्या वादाचे वृत्त दिर्घकाळापासून येत होते. 2011 मध्ये या कपलमध्ये भांडण झाल्याची चर्चा समोर आली होती. परंतू मुलगी समायराच्या जन्मानंतर सर्व काही ठिक झाले होते.


2009 साली झाले होते दोघांचे लग्न..
जूही आणि सचिनने 2009 साली लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतरच त्यांच्यात खटके उडू लागले होते. मुलगी समायराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांसोबत जूळवून घेण्याचा फार प्रयत्न केला पण तसे काही झाले नाही. एका मुलाखतीत सचिनने सांगितले होते की जूही फार रागीट आहे छोट्या छोट्या गोष्टीवर तिला राग येतो तर जूहीने सांगितले होते की सचिनला विसरायची सवय आहे जी तिला अजिबात आवडत नाही.

 

अशी झाली होती पहिली भेट..
जूही आणि सचिनची भेट एका शोच्या सेटवर झाली होती. तिथे त्या दोघांनी एकमेकासोबत प्रथम नंबर एक्सचेंज केला होता. त्यांनी काम केलेला शो कधी ऑनएअर झाला नाही. यानंतर दोघांमध्ये थोडे बोलणे सुरु झाले आणि एके दिवशी सचिनने अचानक जूहीला मुव्ही डेटवर चलण्यास विचारले तर जूहीसुद्धा तयार झाली. यावेळी सचिने तिला प्रपोज केले आणि लगेचच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. केवळ 5 महिन्यांच्या ओळखीतच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता त्यांना 4 वर्षाची मुलगी आहे जिचे नाव समायरा आहे.

 

जूही म्हणाली कधी प्रेमच झाले नाही..
जूहीने घटस्फोटावर बोलताना सांगितले की, जेव्हा सचिनने तिचा लग्नासाठी विचारले तेव्हा तिचे सचिनवर प्रेम नव्हते पणलग्नानंतर आपोआपच प्रेम होईल असे वाटले पण तसे काही झाले नाही आणि हेच घटस्फोटासाठी कारण ठरले.

 

जयपूर येथे झाले होते रॉयल लग्न..
2009 साली जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचे लग्न झाले होते. दोघांनी हा दिवस खास बनवण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केले.दोघांनीही जयपूर येथे शानदार रॉयल वेडींग केले होते. त्यांचे लग्न अजूनही जयपूरच्या टॉप 50 लग्नांमध्ये गणली जाते. 14 फेब्रुवारीलाच दोघांचा साखरपुडा झाला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...