आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये है मोहब्बतें'च्या 'शगुन'ने मुंबईत खरेदी केले नवीन घर, गृहप्रवेशापूर्वी केली गणेशपूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः  'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतील शगुनच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली  अभिनेत्री अनीता हसनंदानी लवकरच एकता कपूरच्या 'नागिन-3' या नवीन मालिकेत झळकणार आहे. तत्पूर्वी तिने मुंबईत एक आलिशान नवीन घर खरेदी केले आहे. गृहप्रवेशापूर्वी अनिताने पती आणि सासूसास-यांसोबत नवीन घरी गणेशपूजा केली.  अनीताच्या या नवीन अपार्टमेंटचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये घरातील काही भाग, बालकनी आणि मोठे टेरेस दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे अनीताचे हे नवीन घर तिच्या आईच्या घराजवळ आहे. 


2013मध्ये बिझनेसमनसोबत थाटले होते लग्न...
- अनिताचे लग्न बिझनेसमन रोहित रेड्डीसोबत झाले आहे. दोघांचे हे लव्ह मॅरेज आहे. रोहित आणि अनीता एकाच जिममध्ये वर्कआउटसाठी जायचे. येथेच दोघांची भेट झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दोघे अनेकदा पब पार्टीजमध्ये एकत्र दिसू लागले होते.
- काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी 14 ऑक्टोबर 2013 रोजी लग्नगाठ बांधली. रोहित तेलुगु असून त्याचा बिझनेस गोव्यात पसरला आहे.
- काव्यांजली (2005-06) या मालिकेत काम करत असताना अनिताचे अभिनेता एजाज खानसोबत अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. पण लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले होते. 

 

या टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे अनिता...
- मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केल्यानंतर अनीताने 'कभी सौतन कभी सहेली' (2001) या

मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
- 'काव्यांजली', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से' या मालिकांमध्ये झळकलेली अनीता आता 'ये है मोहब्बतें' या मालिकेत शगुनच्या भूमिकेत झळकत आहे.
-  'कुछ तो है' (2003), 'ये दिल' (2003), 'कृष्णा कॉटेज' (2004), 'सिलसिले' (2005), 'रागिनी एमएमएस- 2- (2014), हीरो (2015) या चित्रपटांमध्येही अनीता झळकली आहे.  


पुढील स्लाईड्सवर बघा, अनीताच्या नवीन घराचे Photos... 

बातम्या आणखी आहेत...