आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 टीव्ही तारकांची लवकरच 'लांब उडी'!, बॉलिवूडच्या या फिल्म्समध्ये झळकणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत टेलिव्हिजन अॅक्ट्रेसची संख्या वाढली आहे. 'कहीं तो होगा' फेम आमना शरीफ असो की, 'काव्यांजली' फेम अनिता हंसनंदानी असो किंवा 'बिदाई' फेम सारा खान, साऱ्यांनीच बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावले आहे. ग्रेसी सिंह (लगान) आणि साक्षी तंवर (दंगल) सोडले तर एखाद्या टीव्ही अॅक्ट्रेसला बॉलिवूडमध्ये लीड रोल प्ले करण्याची संधी मिळाली असावी. मात्र आता वेळ बदलली आहे. लवकरच इंडस्ट्रीत अनेक अॅक्ट्रेस सिल्व्हर स्क्रीनवर मोठे पात्र साकारताना दिसणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या विषयी... 

 

मौनी रॉय 
टीव्ही शो - क्योंकि सास भी कभी बहू थी, देवो के देव-महादेव, नागिन, नागिन २ 
आगामी चित्रपट  - गोल्ड आणि ब्रह्मास्त्र 

मौनी रॉयने अभिनयाची सुरुवात 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधून केली होती आणि 'नागिन' मधून ती लोकप्रिय झाली. तिच्या या पात्रावर डायरेक्टर रीमा कागदीची नजर पडली आणि त्यांनी मौनीला अक्षय कुमारच्या अपोजिट 'गोल्ड' चित्रपटात घेतले. हा चित्रपट अजून रिलीज झाला नाही. याबरोबरच मौनीला अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र'देखील मिळाला आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणत्या टीव्ही अॅक्ट्रेस झळकणार आहेत मोठ्या पडद्यावर...

बातम्या आणखी आहेत...