आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Balika Vadhu Actress Mahhi Vij Trolled For Using Adopted Kids For Publicity, She Hit Trollers Back Perfect Reply

ट्रोल झाली \'बालिका वधू\'ची अभिनेत्री, यूजर्स म्हणाले- दत्तक घेतलेल्या मुलांकडून करुन घेतेय पब्लिसिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाहने नुकताच आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा केला. येथे अनेक टीव्ही सेलेब्ससोबतच 'बालिका वधू' फेम टीव्ही अॅक्ट्रेस माही विजही आपल्या दत्तक घेतलेले मुलं खुशी आणि राजवीरसोबत आली होती. पार्टी संपल्यानंतर तिला मुलांसोबत पोज देण्यास सांगण्यात आले. तेव्हा तिने दोन्ही मुलांना हात पकडून कॅमेरा समोर आणले. यावेळी मुलगा-मुलगी लाजत फोटो काढत होते. माहीने बळजबरी मुलांसोबत फोटो काढल्यामुळे ती आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. लोक तिच्या वागण्याविषयी अनेक गोष्टी बोलत आहेत. 

 

यूजर्स म्हणाले - मुलं आहेत, ते एखादं प्रोडक्ट नाही
- एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "मुलं आहेत, ते एखादं प्रोडक्ट नाही. तैमूरचे पाहून अशीच फॅशन बनली आहे. प्रत्येक जण आता आई-बाबा होत आहेत. ती कशी(माही) मुलांना हँडल करतेय, जसे लोक रस्त्यांतील मुलांना हँडल करतात. सलमान भाई बघा कसे राहतात मुलांसोबत, कुणी मुलांसोबत फोटो घेतला तर तिथेच कानाखाली लावतात."
- दूस-या यूजरने लिहिले, "भारतीय लोक आपल्या मुलांना प्रमोट करण्यात एवढे उताविळ का झाले आहेत."
- अशा अनेक कमेंट्स टाकून माही विजला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. असे बोलले जातेय की, ती मुलांची योग्य प्रकारे देखरेख करत नाही.

 

माहीने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
- माहीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे, "हेटर्स जे काही बोलत आहेत, त्यांच्या बोलल्यामुळे मला काहीच फरक पडकत नाही, अशा लोकांनी आपल्या आयुष्यात थोडी सकारात्मकता आणायला हवी."
- "सोशल मीडियावर आपण काही गोष्टी कंट्रोल करु शकत नाही. आपण या हेटर्सला हेट आणि लव्हच्या आधारावर फिल्टरही करु शकत नाही. या यूजर्सच्या अशा कमेंट्सचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही."
- "पहिले मला हे सांगा की, मुलांचे पालनपोषण कसे केले जाते. या मुलांचे कुटूंब आमच्यासोबत गेल्या 15 वर्षांपासून राहत आहेत, जे आता आमच्या कुटूंबासारखे झाले आहे."
- "उद्या जर माझे आणि जयचे बाळ झाले तर या मुलांसाठीचे प्रेम कधीच कमी होणार नाही. आम्हाला माहिती आहे की, या मुलांसोबत आम्ही कधीच वाईट करणार नाही."


केअरटेकरच्या मुलांना माहीने घेतले आहे दत्तक
- टीव्ही अभिनेत्री माही विज आणि अॅक्टर जय भानुशीलाने दोन मुलांना आंशिक स्वरुपात दत्तक घेतले आहे. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हे मुलं त्यांच्या पालकांसोबतच राहतील, परंतू त्यांच्या शिक्षणाचा आणि मुलभूत गरजांचा खर्च जय आणि माही करतील.
- या कपलच्या एका फॅमिली फ्रेंडने सांगितले की, " माहीचा स्वभाव खुप दयाळू आहे. ती लहान होती तेव्हा तिच्या कुटूंबात एक केअर टेकर होता. लग्नानंतर तो माहीसोबत त्यांच्या नवीन घरात आला. आता माहीने त्याच केअर टेकरच्या मुलांना दत्तक घेतले आहे. आता ती त्यांचा संपुर्ण खर्च उचलणार आहे."

 

- माहीने टीव्ही अॅक्टर आणि होस्ट जय भानुशालीसोबत 2011 मध्ये लग्न केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा भानुशाली आणि माही विजच्या मुलांचे PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...