आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी फोटोची खिल्ली उडवणा-या लोकांना 'भाभीजी'ने दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- सोशल मीडियावर ट्रोल होतोय टीव्हीची 'भाभीजी'
- ट्रोलर म्हणाले - संस्कार आहेत की, नाही?
- 'भाभीजी'ने विचारले - 'बीचवर बिकिनी नाही तर काय साडी नेसू?'


एन्टटेन्मेंट डेस्क : 'भाभीजी घर पर हैं' मालिकेतील शुभांगी अत्रेने इंस्टाग्रामवर आपला बिकनीवरचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर तिला ट्रोल केले जात होते. आता तिने ट्रोल करणा-यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तिने विचारले की, आता बीचवरही साडी नेसू? शुभांगीने थायलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचा आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. आपल्या 'भाभी जी घर पर है' शोमध्ये शुभांगी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली होती. परंतू तिने बीचवर बिकिनी घातलेला फोटो शेअर केला होता. याच कारणांमुळे सोशल मीडिया यूजर्सने तिची खिल्ली उडवण्यात सुरुवात केली होती. 


शुभांगीने मुलाखतीत विचारला प्रश्न
शुभांगीच्या बिकिनी फोटोवर एका यूजरने लिहिले होते की, -संस्कार आहेत की नाही? तर एकाने लिहिले की, - साडीवर चांगली दिसते. तर एका व्यक्तीने विचारले की, - लोकांना काय वाटते, तिने बीचवर काय घालायला हवे? तेव्हा तिने लिहिले की, 'बीचवर मी साडी किंवा सलवार सूटत घालणार नाही. मी फिट आहे आणि आउटिंगसाठी मी स्विमसूट निवडेल. बिकिनीमध्ये फोटो क्लिक करण्याचा माझा काही प्लान नव्हता. पण माझ्या नव-याने माझा फोटो क्लिक केला तर मला आवडला आणि मी इंस्टाग्रामवर पोस्ट केला. जर भविष्यात मला माझ्या सीनसाठी स्क्रीनवर बिकिनी घालावी लागली तरी मला काहीच प्रॉब्लम नाही. तुमच्याकडे चांगली बॉडी असेल तर दाखवण्यात काहीच प्रॉब्लम नाही.'

 

शुभांगीला आहे 10 वर्षांची मुलगी
शुभांगी अत्रे हिला 10 वर्षांची मुलगी आहे. 37 वर्षांची शुभांगी इंदौरची आहे. सध्या ती नवरा पीयूष आणि मुलीसोबत मुंबईत राहते. शुभांगीने मॉडलिंगमधून करिअरला सुरुवात केली होती. तिने एकता कपूरची मालिका, 'कसौटी जिंदगी की' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. शुभांगीने 'कस्तूरी', 'चिड़िया घर', 'दो हंसों का जोड़ा', 'हवन', 'अधूरी कहानी हमारी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...