आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलर्स म्हणाले, पत्नीच्या पैशांनी हर्षने खरेदी केली कार, भारतीने दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॉमेडियन भारती सिंह सध्या पती हर्ष लिंबाचियासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. भारती रिअॅलिटी शो 'जज्बात'मध्ये नवऱ्यासोबत पोहोचली होती जिथे या कपलने पुन्हा लग्न केले. यावेळी भारतीने कपिलशी निगडीत एक किस्साही शेअर केला आहे ज्यात तिने सांगितले की तिचा पती हर्षला अनेकदा ट्रोलर्स निशान्यावर धरतात आणि पत्नीते पैसे खर्च केल्याचा आरोप लावतात.

 

- भारतीने सांगितले की काही वर्षांपूर्वी हर्षने लग्झरी कारची खरेदी केली होती ज्यानंतर लोक त्याला ट्रोल करायला लागले होते. 
- लोकांनी या गोष्टीवर खराब कमेंटस केले होते
- पतीला ट्रोल करण्यावर भारतीने सांगितले की आज मी रिअॅलिटी शोमध्ये सांगत आहे की हे सर्व ऐकून मला फार दुःख होते. लोकांना असे वाटते की हर्ष कार घेऊ शकत नाही.
- हर्षने स्वतःच्या पैशांनी ती कार विकत घेतली आहे आणि हर्ष फार मेहनती मुलगा आहे आणि मला खूश ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो असे तिने सांगितले.
- भारतीने तिचा लाँगटाईम बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत ३ डिसेंबरला गोव्यात लग्न केले आहे. या लग्नात अनेक सेलेब्स पोहोचले होते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...