आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खतरों के खिलाडी 9’साठी भारती सिंहने कमी केले 10 किलो वजन, शोमध्ये परफॉर्म करणार स्टंट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या नवव्या पर्वात स्पर्धक म्हणून झळकणार आहेत. शोसाठी दोघे कठोर मेहनत घेत आहेत. या शोसाठी भारतीने जवळजवळ नऊ ते दहा किलो वजन कमी केले आहे. या शोमध्ये स्टंट आणि टास्क परफॉर्म करण्यासाठी ती स्वतःला फिट बनवत आहे. 

 

जिमिंगशिवाय भारती स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो करतेय. कधी कधी ती दिवसातून दोनदोन तास वर्कआऊट करते. तर दुसरीकडे भारतीचा नवरा हर्ष वजन वाढवतोय. अर्जेंटिना येथे शूट होणा-या या शोमध्ये पुनीत पाठक, अविका गौर, विकास गुप्ता, अली गोनी, रिद्धिमा पंडित, श्रीसंत, शमिता शेट्टी आणि आदित्य नारायण झळकणार आहेत.

 

'लल्ली'च्या भूमिकेतून प्रसिद्ध झाली भारती...
- भारतीचा जन्म 3 जुलै 1986 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'(2008) च्या चौथ्या पर्वात भारतीला खरी ओळख मिळाली.
- या शोच्या ग्रॅण्ड फिनालेत भारती सेकंड रनरअप ठरली होती. या शोमध्ये भारतीने लल्ली हे कॅरेक्टर साकारले होते. हे पात्र  प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते.
- 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'(2008) शिवाय भारतीने 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार'(2010), 'कॉमेडी सर्कस के तानसेन'(2011) आणि 'कॉमेडी सर्कस के अजूबे'(2012) या कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.
- भारती डान्सिंग रिअॅलटी शो 'झलक दिखला जा-5' (2012) मध्येदेखील झळकली आणि आपले डान्स कौशल्य प्रेक्षकांना दाखवले. सध्या ती कृष्णा अभिषेकसोबत 'कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा'(2015) हा शो होस्ट करतेय.
- भारतीने 'एक नूर'(2011), 'यमले जट यमले'(2012 आणि 'जट एंड जूलिएट-2' (2013) या पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये ती अक्षय कुमार स्टारर 'खिलाडी 786'(2012) आणि पुलकित सम्राट-यामी गौतम स्टारर 'सनम रे'(2016) या चित्रपटांमध्ये झळकली आहे. 

बातम्या आणखी आहेत...