आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 11: ग्रँड फिनालेच्या आधी समोर आला शिल्पाचा Ex, केला हा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस-11 चा ग्रँड फिनाले आता एक आठवड्यावर आला आहे. यामध्ये आता शेवटच्या टॉप 5 कंटेस्टंटमध्ये शिल्पा शिंदे, हिना खान, विकास गुप्ता, आकाश ददलानी आणि पुनीश शर्मा यापैकी कोणी एक विनर होणार आहे. काही दिवसांपूर्वीच लव त्यागी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता. लाइव्ह व्होटिंगमध्ये लवला सर्वात कमी व्होट्स मिळाले होते. त्यानंतर त्याला रियालिटी शोमधून बाहेर पडावे लागले होते. शोमधून इविक्ट झाल्यानंतर लवचे म्हणणे आहे की शिल्पा शोची सर्वात स्ट्राँग कंटेस्टंट असून जिंकण्याचे तिचे सर्वाधिक चान्सेस आहेत. दुसरीकडे शिल्पाच्या एक्स बॉयफ्रेंडने वेगळेच स्टेटमेंट केले आहे. 

 

Ex बॉयफ्रेंडने केले असे स्टेटमेंट... 

- रोमितने या व्हिडिओमध्ये मीडियासोबत बोलताना म्हटले आहे, की मी तिला (शिल्पाला) गेल्या आठ वर्षांमध्ये कधीही आनंदी पाहिलेले नाही. जेव्हा आमची मैत्री होती तेव्हा मी तिला गाईड करत होतो. तेव्हा तिने पॉप्यूलर टीव्ही शो 'मायका' सोडला होता. त्यानंतर 'भाभीजी घर पर है' मधून ती बाहेर पडली होती.  
- तसेच रोमितने शिल्पा शिंदेला सोशल मीडियावर सपोर्ट केले आहे. रोमितने ट्विट केले आहे. त्यामध्ये तो म्हणतो, 'माझ्या पर्सनल लाइफबद्दल काहीही माहित नसताना आणि मला ट्रोल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फेव्हरेट कंटेस्टंटला मत द्या. शिल्पा माझ्यासाठी स्पेशल आहे. गेल्या 8 वर्षांतील माझे मौन हे सांगते मी आजही तिचा सन्मान करतो. तिचा मान राखतो. माझी इच्छा आहे की डिजर्व्हिंग कंटेस्टंटच विनर झाली पाहिजे.'
- फार कमी लोकांना माहित असेल की रोमित आणि शिल्पाचे लग्न होणार होते. दोघांच्या लग्नाचे कार्डही छापले गेले होते. मात्र काही कारणामुळे लग्न होऊ शकले नाही. 
- रोमित आणि शिल्पा ही जोडी माता पिता के चरण में स्वर्ग या सीरियलमध्ये एकत्र दिसली होती.  

बातम्या आणखी आहेत...