आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss'च्या स्पर्धकाने गुपचुप थाटले लग्न, एकेकाळी मौनीसोबत होता रिलेशनशिपमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नातेवाईकांसोबत नवविवाहित दाम्पत्य गौरव आणि हितिशा - Divya Marathi
नातेवाईकांसोबत नवविवाहित दाम्पत्य गौरव आणि हितिशा

'बिग बॉस-10'चा स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता गौरव चोप्रा वयाच्या 38 व्या वर्षी बोहल्यावर चढला. मुळची दिल्लीची असलेल्या हितिशा चिरिन्द्रासोबत गौरवने गुपचुप लग्न उरकले. हितिशा आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात केले. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. खरं तर गौरव टीव्ही इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेता आहे, मात्र त्याने त्याच्या लग्नाता सेलिब्रिटींनी आमंत्रित केले नाही. 


फक्त हे कपल पोहोचले लग्नाला...
- लग्नात गौरवचा बेस्ट फ्रेंड आणि टीव्ही अभिनेता करण मेहरा पत्नी निशा रावलसोबत पोहोचला होता. या दोघांव्यतिरिक्त एकही टीव्ही सेलिब्रिटी लग्नात दिसला नाही. 
- वर-वधूच्या रुपात  गौरव आणि हितिशा अतिशय सुंदर दिसले. हितिशाने लग्नात रेड कलरचा लहेंगा आणि गोल्ड ज्वेलरी घातली होती. 
- तर गौरवने व्हाइट कलरच्या शेरवानीसोबत मरुन रंगाची शॉल घेतली होती.


मौनी रॉयसोबत होते अफेअर...
- खरं तर टीव्ही इंडस्ट्रीसाठी गौरवचे लग्न अतिशय शॉकिंग आहे. कारण तो अनेक दिवस अभिनेत्री मौनी रॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होता. हे दोघे 'पति-पत्नी और वो' या शोमध्ये एकत्र झळकले होते.
- गौरवने मौनीला अनेक वर्षे डेट केले, पण लग्नाची गोष्ट निघताच दोघांचे ब्रेकअप झाले.
- मौनीपूर्वी अभिनेत्री नारायणी शास्त्रीसोबत गौरव रिलेशनशिपमध्ये होते. नारायणीसोबत ब्रेकअप होताच मौनीसोबत त्याचे सूत जुळले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, गौरव चोप्राच्या लग्नाचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...